आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन विक्री:स्वस्त स्मार्टफोनच्या विक्रीत घट; प्रीमियम फोनमध्ये वाढ

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सलग तिसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाली आहे. परंतु प्रीमियम हँडसेटच्या विक्रीत तेजी आली आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आयडीसी) मते, जानेवारी-मार्च तिमाहीत भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनची विक्री वार्षिक ५% कमी होऊन सुमारे ३.७ कोटी झाली आहे. आयडीसीने ओमिको व्हायरसचा प्रसार, कमी किमतीच्या हँडसेटचा कमी पुरवठा आणि वाढती महागाई अशी तीन कारणे यामागे असल्याचे म्हटले आहे. गेल्या तिमाहीत देशातील एकूण स्मार्टफोन विक्रीमध्ये ५ जी हँडसेटचा वाटा ३१% वर पोहोचला आहे. मार्च तिमाहीत १५,५०० रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोनच्या विक्रीत १६% घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...