आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुती जिम्नी एप्रिलपासून मिळणार:11 हजारांत बुकिंग; टाटाने आणली 2 सिलिंडरची पंच, टोयोटाची 2.17 कोटींची SUV

ग्रेटर नोएडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) आणि बहुउद्देशीय वाहने (MPVs) यांचे वर्चस्व होते. मारुती, टाटा, एमजी, किया आणि टोयोटा यांनी त्यांच्या एसयूव्हीचे प्रदर्शन येथे केले.

मारुतीने 5 डोअर जिम्नी आणि फ्रॉक्स या 2 नवीन एसयूव्ही लाँचच केल्या नाहीत, तर त्यांची बुकिंगही सुरू केली. मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, या दोन्ही एसयूव्ही दोन ते अडीच महिन्यांत बाजारात येतील. म्हणजेच एप्रिल 2023 पासून त्यांची डिलिव्हरी सुरू होईल.

टाटाने छोटी एसयूव्ही पंचचे CNG मॉडेल प्रदर्शित केले. रंजन अंबा, उपाध्यक्ष (विक्री, विपणन आणि कस्टमर केअर) पॅसेंजर व्हेईकल्स, टाटा मोटर्स, म्हणाले की कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटचा पंच ट्विन सिलिंडर सिस्टमसह आणली आहे. कंपनीने एक्स्पोमध्ये कर्व्हचे प्रदर्शनदेखील केले. पुढच्या वर्षी ती बाजारात पाहायला मिळेल.

मॉरिस गॅरेज म्हणजेच MGने 5, 6 आणि 7 सीटर हेक्टर लॉन्च केली. एमजी इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर (CCO) गौरव गुप्ता यांनी सांगितले की, कंपनीचे लक्ष कॉम्पॅक्ट आणि मोठ्या एसयूव्ही दोन्हीवर आहे. कंपनीच्या इतर एसयूव्हीही येत्या काळात लाँच केल्या जातील. कियाने लक्झरी MPV KA4 चे प्रदर्शन केले. त्याच वेळी, टोयोटाने इनोव्हा हायक्रॉस आणि लक्झरी एसयूव्ही लँड क्रूझर 300 दाखवली.

या SUV आणि MUVच्या वैशिष्ट्यांबद्दल एकेक करून जाणून घ्या आणि ती तुमच्यासाठी केव्हा उपलब्ध असतील तेदेखील पाहा…

मारुती जिम्नी आणि फ्रँक्स मार्च-एप्रिलपर्यंत येतील

मारुतीने जिम्नी आणि फ्रँक्स या नवीन एसयूव्हीचे बुकिंग सुरू केले आहे. तुम्ही ते नेक्सा शोरूममध्ये 11,000 रुपयांत बुक करू शकता. जिम्नी ही 4 व्हील ड्राइव्ह आहे आणि ती 210 मिमीच्या ग्राउंड क्लिअरन्ससह येईल. या एसयूव्ही मार्च-एप्रिलदरम्यान बाजारात येतील. कंपनीने त्यांची किंमत जाहीर केलेली नाही. पण जिम्नीची किंमत 10 ते 12 लाख असू शकते असे मानले जात आहे. दुसरीकडे, फ्रँक्सची किंमत 8 लाखांपासून सुरू होऊ शकते.

मारुतीने ब्रेझाची CNG आवृत्तीही सादर केली

मारुतीने ऑटो एक्स्पोमध्ये ब्रेझा CNGही सादर केली होती. ब्रेझा CNG मार्च 2023 पर्यंत बाजारात येईल. त्याची किंमत सामान्य ब्रेझापेक्षा 95,000 पर्यंत जास्त असू शकते. म्हणजे 9 ते 13 लाखांच्या दरम्यान किमती शक्य आहेत.

मारुतीने ब्रेझा 2023 मध्ये नवीन मेट ब्लॅक मॉडेलदेखील सादर केले आहे. ब्रेझाची ब्लॅक एडिशन नेक्सामध्ये उपलब्ध असेल. यामध्ये एलईडी प्रोजेक्टिंग लॅम्प, फ्लोटिंग डीआरएल, फॉग लॅम्प आणि एलईडी टेल लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये असतील. हे ड्युअल टोन 16 इंच अलॉय व्हील्ससह लॉन्च करण्यात आले आहे. यात 9-इंचाची स्मार्टप्ले प्रो प्लस स्क्रीन आहे. जी 40 कनेक्टेड कार वैशिष्ट्यांसह येते. यात 1.5 लीटर इंजिन आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये 6 एअरबॅग आणि 360 डिग्री कॅमेरा समाविष्ट आहे.

टाटा पंच CNG: ट्विन सिलिंडरसह लाँच

टाटा मोटर्सने छोट्या एसयूव्ही पंचची CNG आवृत्ती लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे यात ड्युएल सिलिंडर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. CNGचे दोन सिलिंडर बसवल्यामुळे त्याची बूट स्पेस मोकळी झाली आहे.

टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेइकल्सचे उपाध्यक्ष (विक्री, विपणन आणि ग्राहक सेवा) रंजन अंबा यांनी सांगितले की, देशात प्रथमच ड्युएल सिलिंडरमध्ये CNG येणार आहे.

मात्र, त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपये असू शकते असे मानले जात आहे.

आता मोठ्या आणि प्रीमियम SUV बद्दल जाणून घ्या… सर्वप्रथम मॉरिस गॅरेज म्हणजेच एमजी हेक्टर

एमजी हेक्टर फेसलिफ्ट

MG ने हेक्टरच्या फेसलिफ्ट केलेल्या मॉडेल्सचे अनावरण केले आहे आणि त्यांच्या किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये नवीन एमजी हेक्टर आणि हेक्टर प्लस या दोन्हींचा समावेश आहे. एमजी हेक्टर हे 5 सीटर मॉडेल आहे. त्याची किंमत 14.73 लाखांपासून सुरू होते. एमजी हेक्टर प्लस 6 आणि 7 सीटर असेल. त्याची किंमत 17.5 आणि 20.15 लाख असेल. हेक्टर आणि हेक्टर प्लस पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनमध्ये उपलब्ध असतील.

कियाचे नवीन कार्निवल KA4

कियाने लक्झरी मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) KA4 (कार्निव्हल) सादर केले. हे 7, 9 आणि 11 सीटरमध्ये येऊ शकते. कंपनीने त्याची किंमत जाहीर केली नसली तरी. सध्याच्या किया कार्निव्हलची ही अपग्रेडेड आवृत्ती आहे. हे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनसह येऊ शकते. त्याचे उत्पादन 2024 च्या अखेरीस सुरू होऊ शकते.

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस आणि लँड क्रूझर 300

टोयोटाने लक्झरी SUVs लँड क्रूझर 300 आणि इनोव्हा हायक्रॉस सादर केली. लँड क्रूझर 300 फक्त डिझेल इंजिनसह येईल. कंपनीने यामध्ये 3.3 लीटर टर्बो V6 डिझेल इंजिन बसवले आहे. हे 10 स्पीड ऑटो गिअर्सद्वारे नियंत्रित केले जाते. त्याचा डॅशबोर्ड नवीन डिझाइनसह आणण्यात आला आहे. यात हेड-अप डिस्प्ले आहे, जो फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सिस्टमसह येतो. तसेच यात प्रीमियम साऊंड सिस्टिम आहे. तुम्ही 10 लाख रुपये देऊन ते बुक करू शकता. त्याची किंमत 2.17 कोटी असेल.

टोयोटाने इनोव्हा हायक्रॉसदेखील प्रदर्शित केले. त्याची किंमत 18.30 लाख ते 28.97 लाखदरम्यान आहे. यात 2 लीटरचे हायब्रिड इंजिन आहे. कंपनीचा दावा आहे की ही SUV 23.24 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देईल. यात 10.1 इंचाचा डिस्प्ले आहे.

टाटाने कर्व्ह एसयूव्ही सादर केली

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये टाटा मोटर्सने SUV टाटा कर्व्ह सादर केली. टाटाच्या प्रीमियम एसयूव्हीच्या यादीत या कारचा समावेश होणार आहे. टाटा कर्व्ह ही कंपनीने कूप कन्सेप्ट म्हणून ठेवली आहे. कंपनीने अद्याप या कारबाबत जास्त माहिती दिलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...