आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी पडताळणी:ई-कार 3 वर्षांत 6 पट वाढल्या, बॅटरी 9 वर्षांत 90 टक्के स्वस्त

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वीलेखक: धर्मेंद्रसिंह भदौरिया
  • कॉपी लिंक
  • ई-वाहने वाढली, पण मार्गात अनेक अडथळे

प्रदूषण रोखणे आणि वाहनांचा प्रति किमी खर्च घटवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्सनुसार (एसएमईव्ही) गेल्या तीन वर्षांत ई-कारमध्ये सुमारे ६ पट आणि ई- टू व्हीलरमध्ये ९ पट वाढ झाली आहे. अजूनही सर्वात मोठे आव्हान म्हणजे बॅटरीचा खर्च. तो वाहनाच्या किमतीच्या ३५% आहे. तथापि, गेल्या नऊ वर्षांत हा खर्च ९० टक्क्यांपर्यंत घटला आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत त्यात आणखी ५० टक्के घट होईल. दोन वर्षांत बॅटरींची निर्मितीही सुरू होईल. नीती आयोग आणि रॉकी माउंटन इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार देशात इलेक्ट्रिक बॅटरीची बाजारपेठ २०३० मध्ये ३०० अब्ज डॉलरची होईल. सध्या ई-वाहनांच्या बॅटरीची किंमत एक तृतीयांश आहे. वाहनांची संख्या वाढल्यावर ती घटून १६ टक्क्यांपर्यंत येईल. २०२५ पर्यंत देशात विकणारी सर्व नवी दुचाकी वाहने इलेक्ट्रिकची असतील, अशी अपेक्षा नीती आयोगाला आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, बॅटरीची किंमत ९-१० वर्षांत ९० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. काही वाहनांतील बॅटरी १०० डॉलर प्रति किलोवॅट अवरपर्यंत आली आहे. सरासरी किंमत १३९ डॉलर आहे.

ई-वाहनांसाठी बँकांकडून कर्ज मिळण्याचे आव्हान
एसएमईव्हीचे संचालक मानू शर्मा म्हणाले की, देशात ई-वाहने, त्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या १५० वर कंपन्या आहेत. एकूण वाहनांच्या विक्रीत एक टक्का वाटा ई-वाहनांचा आहे. मात्र, ई-वाहनांसाठी बँकांकडून सहजपणे कर्ज मिळत नाही.

बॅटरी, चार्जिंग नेटवर्क, किंमत ई-वाहन बाजारासाठी मोठी आव्हाने बॅटरी: आता आयात होते. शिसे आधारित बॅटरी जड असते आणि दोन-तीन वर्षेच चालते. चार्जिंग नेटवर्क: ई-वाहनां-साठी चार्जिंग सुविधा नाही. बंगळुरू व दिल्लीसारख्या शहरांतही चार्जिंग स्टेशन अपुरे आहेत. पेट्रोल पंपाप्रमाणे चार्जिंग स्टेशन असावेत. किंमत: सध्या देशात चारचाकी ई- वाहनांची किंमत डिझेल किंवा पेट्रोल वाहनांच्या तुलनेत सुमारे दुप्पट आहे.

२०२५ पर्यंत १५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या सर्व दुचाकी इलेक्ट्रिक
२०२५ पर्यंत १५० सीसीपेक्षा कमी क्षमतेची सर्व दुचाकी वाहने इलेक्ट्रिक असावीत, अशी नीती आयोगाची योजना आहे. आयोगाचे माजी प्रमुख सल्लागार अनिल श्रीवास्तव म्हणाले की, दोन ते पाच वर्षांत बॅटरीचा खर्च वाहनाच्या किमतीच्या १६ ते १८% पर्यंत येऊ शकतो.

सरकारचे ई-वाहनांना प्रोत्साहन
- बॅटरी निर्मितीसाठी २०२२ ते २०३० पर्यंत विविध कार्यक्रमांतर्गत ३१,६०० कोटी रुपयांचा निधी देणार. अॅडव्हान्स्ड सेल केमिस्ट्री बॅटरीसाठी २०२२-२०२६ पर्यंत १८,१०० कोटी रुपयांची योजना मंजूर झाली आहे.
- अवजड उद्योग मंत्रालयाने हायवेवर एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट जारी केले आहेत. शहरांत २,६३६ चार्जिंग स्टेशन बनवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- ई-वाहने मार्च २०२३ च्या आधी खरेदी केली तर कर्जाच्या व्याजावर १.५ लाख रु. पर्यंत प्राप्तिकर सवलत.
- हैदराबादची बॅटरी निर्माता कंपनी रोशन एनर्जीचा अमेरिकी बॅटरी कंपनी बॅरल एनर्जीशी करार झाला आहे. दोन वर्षांत बॅटरी तयार होण्यास सुरुवात. गुजरात, तामिळनाडूसहित इतर राज्यांतही बॅटरी तयार होईल.

बातम्या आणखी आहेत...