आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहामारीनंतर अमेरिकेत होणाऱ्या पहिल्या मोठ्या कार्यक्रमात लोकांचे स्वागत करणे किती आनंददायक आहे हे सांगू शकत नाही. त्याला सणासारखे साजरे करतोय... हे शब्द आहेत अमेरिकेत मोठ्या ऑटो इव्हेंटमध्ये सहभागी शिकागो ऑटो शोचे जीएम डेव्ह स्लोअन यांचे. इलिनॉयचे गव्हर्नर जेबी प्रिट्झकर म्हणतात, उत्सव आशा जागवतो. गर्दी बघून बरे वाटते, हॉटेल, रेस्तराँ भरू लागले आहेत. शहरात आयुष्य परतले आहे. या शोमध्ये फोर्ड, बीएमडब्ल्यू, होंडा, जीप, निसान व टोयोटासह २४ ब्रँड सहभागी आहेत. जाणून घ्या काय आहे खास...
ड्रायव्हिंगसाठी जास्त वेळ मिळावा, चार्जिंगला कमी लागावा म्हणून या कार 5-10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 90 किमी धावतील
फुल चार्जमध्ये ४८० किमी, केवळ १० मिनिट चार्जिंगमध्ये ८७ किमी धावेल
फोर्ड लायटनिंग 150: हे ईव्ही वीज गेल्यास जनरेटरचे काम करेल. घराला तीन दिवस पुरवठा. ऑटो अॅनालिस्ट जो विसेनफेल्डर म्हणतात, वीज जाताच पुरवठा सुरू करेल. यात नॅचरल व्हॉइस कंट्रोल, क्लाऊड बेस्ड नेव्हिगेशनसारखे फीचर. फुल चार्जमध्ये ४८० किमी व १० मिनिट चार्जिंगमध्ये ८७ किमी धावते. अमेरिकेत किंमत ३० लाख रु. आहे.
स्टारशिपवर कॅफे लाउंजसारखे आहे या एसयूव्हीचे केबिन डिझाइन
निसान एरिया : पूर्ण इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. तिचे इंटेरिअर स्टारशिपवर कॅफे लाउंजसारखे आहे. सिंगल चार्जमध्ये ६१० किमी धावेल. पॉवर स्लायडिंग कन्सोल, जे अॅडजस्ट करता येते. अॅपल कारप्ले, अॅलेक्सा, अँड्रॉइडसाठी वायरलेस इंटिग्रेशन. दुसऱ्या इलेक्ट्रिक एसयूव्हीप्रमाणे फ्रंट ट्रंक नाही. किंमत ३५ लाख रुपयांपासून सुरू होते.
एसयूव्हीसारखा लूक, स्पोर्ट्स कारसारखी चालेल, हाेम जनरेटरही
किआ ईव्ही6 : कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक क्रॉसओव्हर. १८ मिनिटांत ८०% चार्ज. फुल रेंज ५८० किमी. कंपनीच्या ब्रँड एक्स्पीरियन्सचे प्रमुख मायकेल मॅकहेल यांच्यानुसार एसयूव्हीसारखी दिसते, स्पोर्ट्स कारसारखी चालते. पोर्टेबल पॉवर जनरेटरचे कामही करते. ई-बाइक, लॅपटाॅप, गृह उपकरणे चालवता येतील. किंमत ३३ ते ३६ लाख रु.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.