आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्सना सेफ्टी रेटिंग देणारी जागतिक संस्था ग्लोबल NCAP ने मंगळवारी चार कारच्या क्रॅश टेस्टचे रिपोर्ट जारी केले आहेत. यात फॉक्सवॅगनची व्हर्टस, स्कोडाची स्लॅव्हिया आणि देशातील विक्रीच्या बाबतीत दर महिन्याला टॉप-10 मध्ये असणाऱ्या मारुती सुझुकीच्या ऑल्टो K10 आणि वॅगनआरचा समावेश आहे.
क्रॅश टेस्टमध्ये व्हर्टस आणि स्लॅव्हियाचा परफॉर्मन्स चांगला होता. तर मारुती सुझुकीच्या वॅगनआर आणि ऑल्टो K10 ने पुन्हा एकदा निराश केले आहे. वॅगनआरला अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 5 पैकी एक स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये शून्य स्टार मिळाला आहे.
ऑल्टो K10 ला अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 2 स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये शून्य स्टार मिळाला आहे. तर व्हर्टस आणि स्लॅव्हिया दोन्हींनाही दोन्ही ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 5 स्टार मिळाला आहे. ऑल्टो K10 आणि वॅगनआरचा भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारमध्ये समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1.95 लाख वॅगनआर विकल्या गेल्या
वॅगनआरची बॉडी शेल इंटिग्रिटी अनस्टेबल आढळली आहे. सेफ्टी फीचरविषयी बोलायचे झाल्यास या कारच्या ज्या व्हेरिएंटची क्रॅश टेस्ट करण्यात आली त्यात ABS, ड्युअल एअरबॅग, EBD, सीट बेल्ट प्रिटेन्शनर विथ लोर्ड लिमिटर आणि सीट बेल्ट रिमाइंडर असे फीचर्स होते. वॅगनआर ही कार डिसेंबर 1999 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशात 1.95 लाख वॅगनआर विकल्या गेल्या आहेत.
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1.95 लाख ऑल्टो K10 विकल्या गेल्या
क्रॅश टेस्टमध्ये ऑल्टो K10 ची बॉडी शेल इंटिग्रिटी स्टेबल आढळली आहे. म्हणजेच सुरक्षेच्या बाबतीत ही कार वॅगनआरपेक्षा जास्त सुरक्षित आहे. ऑल्टो K10 च्या ज्या व्हेरिएंटची क्रॅश टेस्ट करण्यात आली, त्यात वॅगनआर प्रमाणेच ABS, ड्युअल एअरबॅग, EBD, सीट बेल्ट प्रिटेन्शनर विथ लोर्ड लिमिटर आणि सीट बेल्ट रिमाइंडर असे फीचर्स होते. ऑल्टो 27 सप्टेंबर 2000 रोजी भारतात लॉन्च करण्यात आली होती. सध्याच्या ऑल्टोत अनेक बदल करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशात एकूण 1.70 लाख ऑल्टो विकल्या गेल्या होत्या.
मारुती विटारा ब्रिझा सर्वात सेफ कार
ग्लोबल NCAP ने गेल्या 9 वर्षांत मारुती सुझुकीच्या 14 कारची टेस्ट केली आहे. यात केवळ विटारा ब्रिझालाच 4 स्टार रेटिंग मिळाली होती. सध्या ही कार कंपनीने डिसकन्टिन्यू केली आहे. यानंतर 3-स्टार रेटिंगसह अर्टिगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय मारुतीच्या जितक्या कारची क्रॅश टेस्ट करण्यात आली, त्यात सर्व गाड्यांनी जास्तीत जास्त 2 स्टार मिळवले आहेत.
ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मारुती स्वीकारत नाही
मारुती सुझुकी इंडियाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शशांक श्रीवास्तव कारच्या सेफ्टीविषयी म्हणाले की, 'NCAP कडून कारला सेफ्टी रेटिंग दिली जाते. ही भारतीय स्थितीनुसार नाही. म्हणून मारुती याला मानत नाही. भारताची रेटिंग सिस्टिमच योग्य प्रकारे कारला रेट करू शकेल'
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.