आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Tech auto
 • Auto
 • Half Of The Electric Scooters On The Market By 2030; PLI Will Also Reduce The Cost Of Batteries And E scooters News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-मोबिलिटी:२०३० पर्यंत बाजारात निम्म्या स्कूटर इलेक्ट्रिक; पीएलआयमुळे बॅटरी किंमत आणि ई-स्कूटरच्या किमतीतही घट येईल

मुंबई25 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • ओलासारखे नवे खेळाडू उतरणे आणि सरकारच्या पोषक धोरणांचा मिळेल फायदा

इलेक्ट्रिक कारवर सर्वांच्या नजरा असताना, देशात ई-मोबिलिटी क्षेत्रात स्कूटरने बाजी मारली आहे. ओलासारखे नवे खेळाडू बाजारात उतरणे आणि पोषक सरकारी धोरणांचा फायदा ई-स्कूटर्सना मिळणार आहे. २०३० पर्यंत देशात विकणाऱ्या एकूण स्कूटर्समध्ये निम्म्या ई-स्कूटर्स असतील, असा अंदाज आहे. वित्तीय सेवा प्रदान करणारी कोटक इन्स्टिट्युशन इक्विटीच्या एका अहवालानुसार, भारतात इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी एका निर्णायक वळणावर आली आहे. अॅडव्हान्स केमेस्ट्री सेलमध्ये पीएलआय स्कीम, मेक इंडिया आणि फेम-२सारखे अनुकूल सरकारी धोरणे, बाजारात नवे खेळाडू उतरल्याने वेगाने वाढणारी स्पर्धा आणि पेट्रोल स्कूटर्सच्या तुलनेत आक्रमक किमतीत चालणाऱ्या ई-स्कूटर बाजारात वेगाने वाढण्यासाठी तयार आहेत.

कोटक इन्स्टिट्युशन इक्विटी रिसर्चचे विश्लेषक हितेश गोयल यांनी आपल्या अहवाालात नमूद केले की, पीएलआय योजनेमुळे बॅटरीच्या किमती कमी होतील आणि यामुळे ई-स्कूटरच्या किमतीत घट येईल. एकूण वाहन खर्चाच्या जवळपास ४०-५०% बॅटरी खर्च होते. ओला इलेक्ट्रिक आक्रमक मूल्य धोरणाचे पालन करेल. २०३० पर्यंत ५० टक्के स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरीत होतील. २०३६ पर्यंत स्कूटरचा ६० टक्के हिस्सा इलेक्ट्रिककडे शिफ्ट होईल.

पूर्ण तयारी : देशात आगामी वर्षांत अनेक पट वाढेल ई-स्कूटर उत्पादन

 • ओला इलेक्ट्रिक २० लाख युनिट प्राथमिक वार्षिक क्षमतेचा जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना होत आहे. हे पुढे जाऊन १ कोटी वार्षिक क्षमतेपर्यंत केले जाऊ शकते.
 • हीरो इलेक्ट्रिक येत्या काही वर्षांत आपल्या क्षमतेस ७० हजारांहून वाढून २.५० लाख युनिटपर्यंत करेल.
 • ओकिनावाच्या काही वर्षांत वार्षिक क्षमतेच्या ९० हजार युनिट्सवरून वाढून १० लाख करण्याची योजना आहे.
 • अॅम्पियर अापली वार्षिक क्षमतेच्या सध्याच्या ५० हजार युनिटवरून वाढून १० लाख युनिट करत आहे.
 • एथर एनर्जी आपली वार्षिक क्षमता २५ हजार युनिट्सवरून वाढून १.३५ लाख युनिट्सपर्यंत केली आहे.
बातम्या आणखी आहेत...