आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई:1500 रुपयांपर्यंत महागणार हीरो मोटोकॉर्पच्या टू-व्हिलर, नवीन वर्षापासून लागू होणार नवीन किमती

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनी म्हणाली - स्टील, प्लास्टिकसह सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या
  • याआधी मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रासह कार कंपन्यांनीही किमतीत वाढ केली

कार कंपन्यांनंतर आता मोटारसायकल कंपन्यांनीही आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात देशातील सर्वात मोठी मोटारसायकल कंपनी हीरो मोटोकॉर्पने केली आहे. 1 जानेवारी 2021 पासून हिरोच्या सर्व दुचाकींची किंमत 1500 रुपयांनी वाढणार असल्याचे कंपनीने सांगितले. दुचाकी बनवण्यासाठीचा खर्च वाढल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या

कंपनीने निवेदनात म्हटले की, दुचाकीच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या कच्च्या मालांच्या किमतीत वाढ झाली आहे. यामध्ये स्टील, अॅल्युमिनियम, प्लॅस्टिक आणि किमती धातूंचा समावेश आहे. कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीचा परिणाम कमी करण्यासाठी कंपनीने मोटारसायकलींच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान दुचाकी मॉडेलनुसार किमती वेगवेगळ्या राहतील.

ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्नशील

कंपनीने म्हटले की, आम्ही आधीच लीप -2 छत्र अंतर्गत बचत कार्यक्रम वेगाने राबविला आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम कमी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांवर पडणारा बोजा कमी करण्यासाठी आणि आमच्या मार्जिनच्या सुरक्षेसाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

मारुती सुझुकीसह अनेक कार कंपन्यांनी दरवाढीची घोषणा केली

कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने अनेक कार कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किंमती वाढविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, फोर्ड इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा आणि किया मोटर्सचा समावेश आहे. 1 जानेवारी 2021 पासून नव्या किमती लागू होणार असल्याचे या कंपन्यांनी सांगितले. दरम्यान कोणत्याही कंपनीने वाढणाऱ्या रकमेची घोषणा केली नाही.

बातम्या आणखी आहेत...