आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • If The Power Goes Out, This Car Will Light Up Your House; Prices Start From Rs 30 Lakh |Mararhi News

अमेरिकेची कार:वीज गेली तर ही कार उजळवेल तुमचे घर; किंमत 30 लाख रुपयांपासून सुरू

कॅलिफोर्निया7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेची कार कंपनी जनरल मोटर्स करत आहे चाचण्या

इको-फ्रेंडली आणि किफायतशीर असण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहने आता तुमच्या घरांसाठी पॉवर बॅकअप म्हणूनही काम करतील. जगातील प्रसिद्ध ऑटो कंपनी जनरल मोटर्स या दिशेने चाचण्या करत आहे. कंपनीच्या वाहनांमध्ये बसवलेल्या शक्तिशाली बॅटऱ्या केवळ लांब पल्ल्याच्या प्रवासातच मदत करणार नाहीत तर इतर वाहने आणि घरांमध्ये जनरेटर चार्ज करण्यासाठी पॉवर बॅकअपदेखील प्रदान करतील. जनरल मोटर्स ही चाचणी पॅसिफिक गॅस आणि इलेक्ट्रिक कंपनीच्या सहकार्याने तिच्या आगामी २०२४ शेवरोले सिल्व्हरॅडो ई-वाहनाच्या माध्यमातून घेत आहे. शेवरोले सिल्व्हरॅडोची किंमत ३० ते ८० लाखांच्या दरम्यान असेल. याआधी फोर्ड मोटर्सने त्यांच्या एफ-१५०लायटनिंग पिक-अपद्वारे होम पॉवर बॅकअपची घोषणा केली होती.

बातम्या आणखी आहेत...