आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ऑटो:जूनमध्ये मारुतीने मेच्या तुलनेत तिप्पट जास्त गाड्या विकल्या, ह्युंदाईची विक्रीही वाढली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशांतर्गत बाजारात कॉम्पॅक्ट श्रेणीत गाड्यांची जास्त मागणी राहिली
  • अनलॉक -१ मध्ये वाढली देशातील कारची विक्री, बहुतांश कंपन्यांचे आकडे चांगले

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी इंडियाने जूनमध्ये ५७४२८ गाड्या विकल्या आहेत. ही मेमध्ये विक्री झाल्याच्या तुलनेत सुमारे तिप्पट आहे. मेमध्ये कंपनीने १८,५३९ गाड्या विकल्या होत्या. असे असले तरी, जून २०१९ च्या तुलनेत मारुतीच्या विक्रीत ५४ टक्के घसरण आली आहे. जून २०१९ मध्ये कंपनीने १,२४,७०८ गाड्या विकल्या होत्या. कोरोना विषाणूमुळे मेमध्ये मारुतीचे बहुतांश प्लँट आणि शोरूम बंद होते. जूनमध्ये अनलॉक-१ अंतर्गत मिळालेल्या सवलतीनंतर वाहनांच्या विक्रीत तेजी आली आहे. मारुतीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री ५३,१३९ वाहने राहिली, तर ४२८९ गाड्यांची निर्यात झाली. जून तिमाहीत कंपनीने एकूण ७६,५९९ वाहने विकली. यामध्ये तिची देशांतर्गत विक्री ६६,१६५ युनिट राहिली. जून २०२० दरम्यान वाहन आकड्याला कोविड-१९ महामारी, लॉकडाऊन आणि सुरक्षा निर्बंधांच्या संदर्भाने पाहिले पाहिजे.

८ जूनपासून सुरू अनलॉक-१ मुळे आकड्यांत सुधारणा, जुलैकडून आणखी आशा

टोयोटाची विक्री सहापट वाढली

टोयाेटा किर्लाेस्कर मोटरची एकूण विक्री जूनमध्ये ३,८६६ वाहने राहिली. गेल्या वर्षी जूनमध्ये कंपनीची विक्री १०,६०३ वाहन युनिट होती. या वर्षी मेमध्ये कंपनीने १,६३९ वाहनांची विक्री केली होती. याच पद्धतीने मेच्या तुलनेत जूनमध्ये देशांतर्गत बाजारात कंपनीने सुमारे सहापट जास्त गाड्या विकल्या.

ह्युंदाईने जूनमध्ये विकल्या २६,८२०

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने जूनमध्ये २६,८२० गाड्या विकल्या. कंपनीच्या निवेदनानुसार, त्यांच्या सर्व नव्या-जुन्या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने जूनमध्ये देशांतर्गत बाजारात २१,३२० वाहने विकली. यासोबत ५५०० गाड्या विविध देशांत विकल्या होत्या. मे महिन्यात कंपनीने ६,८८३ गाड्या विकल्या होत्या.

मारुती २६ हजार कॉम्पॅक्ट कार विक्री

जूनमध्ये अल्टो आणि वॅगनआरसारख्या लहान कारची विक्री १०,४५८ युनिट राहिली. याच पद्धतीने स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायरसारख्या मॉडेलच्या कॉम्पॅक्ट श्रेणीत विक्री २६,६९६ युनिट राहिली. मध्यम आकाराच्या सेडान सियाजची विक्री गेल्या महिन्यात ५५३ युनिट राहिली.

0