आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसाय वृद्धी:गणेशोत्सवात कार व दुचाकीच्या मागणीत वाढ; ग्राहक वेटिंगवर, स्वस्त कर्ज आणि कोरोना संसर्गानेही वाहन विक्री वाढली

भोपाळ, रायपूर, औरंगाबाद, रांची, इंदूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर | कार निर्माती कंपनी ह्युंदाई मोटर्सचे जयपूर येथील शोरूम. - Divya Marathi
जयपूर | कार निर्माती कंपनी ह्युंदाई मोटर्सचे जयपूर येथील शोरूम.
  • सणांमुळे वाहनांची विक्री ठीक झाली, गणेश चतुर्थीकडून अपेक्षा

जून-जुलैमध्ये कार आणि दुचाकीच्या विक्रीतील वाढीनंतर ऑगस्टमध्ये मागणी आणखी वाढली आहे. स्वस्त कर्ज आणि गणेशोत्सव हे यामागचे कारण आहे. अचानक वाढलेली मागणी आणि प्लँटमधून पुरवठा सुरू झाल्यामुळे गाड्यांचा प्रतीक्षा अवधी १० ते १५ दिवस झाला आहे. वाहन उद्योगात प्रतीक्षा अवधीची स्थिती दोन वर्षांनंतर परतली आहे. मात्र, गणेश चतुर्थीच्या दिवशी कार खरेदी करण्यास इच्छुक बहुतांश ग्राहकांनी आधीच बुकिंग केली आहे. भोपाळ, रायपूर, औरंगाबाद, रांची, इंदूर आणि अहमदाबादसह जवळपास सर्व शहरांत वाहनांसाठी मागणी आहे. झारखंडमध्ये २५ टक्क्यांपेक्षा जास्त बुकिंग होत आहे. रायपूरमध्ये बुकिंगनंंतर १० ते १५ दिवसांनंतर डिलिव्हरी मिळत आहे. छत्तीसगडमध्ये सणासुदीत २० हजार दुचाकी विकण्याचा अंदाज आहे. औरंगाबादमध्ये कारच्या मागणीत सुधारणा झाली आहे. नव्या मॉडेलची चौकशी वाढली आहे. भोपाळमध्येही ऑगस्टमध्ये ३५०० ते ४००० दुचाकी विक्रीचा अंदाज आहे. इंदूरमध्ये गणेश उत्सवाआधी गाड्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. इंदूर ऑटो डीलर असोसिएशनचे संयुक्त सचिव विशाल पमनानी यांच्यानुसार, जुलै-आॅगस्टमध्ये वाहनांची विक्री गेल्या वर्षीच्या सरासरी पातळीवर पोहोचली आहे.

चांगली बुकिंग व वेटिंगचे कारण
- कार अाणि दुचाकी कर्ज ७ ते ८ टक्क्यांच्या आतापर्यंत नीचांकी पातळीवर आहे.
- लॉकडाऊनमध्ये शोरूम बंद राहिल्याने यादी मोठी झाली.
- लोक सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे त्यांना स्वत:ची गाडी हवी आहे.
- प्लँट बंद असल्यामुळे पुरवठ्यात तुटवडा झाला आहे.

महाराष्ट्र : नव्या गाड्यांच्या चौकशीत झाली वाढ
फोर व्हीलर डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीष धूत यांनी सांगितले की, कार बाजारांत सुधारणा होत आहे. नव्या गाड्यांची चौकशी होत आहे. मात्र, बाजारात काही मॉडेल्सच्या गाड्या उपलब्ध होत नाहीत. येथे १०० पेक्षा जास्त कार विकण्याची आशा आहे. याच पद्धतीने सुमारे १००० ते १२०० दुचाकी विकण्याचा अंदाज आहे.

छत्तीसगड : या वेळी मोठ्या व्यवसायाची शक्यता
रायपूर ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनीषराज सिंघानिया यांनी सांगितले की, छत्तीसगडमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त मोठा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागांत वाहनांच्या विक्रीत तेजी येईल. होंडा डीलर कैलाश खेमानी म्हणाले, गणेश चतुर्थीनिमित्त २० हजार दुचाकी वाहनांच्या विक्रीची शक्यता आहे.

झारखंड : वाहनांची विक्री २५ %पर्यंत जास्त राहिली
झारखंडमध्ये कोरोना काळात वाहन क्षेत्रात तेजी दिसली आहे. कोरोना काळात कार व दुचाकींची विक्री सुमारे २५ टक्क्यांपर्यंत जास्त राहिली. प्रथम झारखंडमध्ये दर महिन्यास १० हजार गाड्या विकत होत्या. जुलैमध्ये यापेक्षा जास्त १२,५०० गाड्यांची विक्री झाली. प्रथम सुमारे प्रतिमहा ४००० कार विकत होत्या.

सणांमुळे वाहनांची विक्री ठीक झाली, गणेश चतुर्थीकडून अपेक्षा : फाडा
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, या महिन्यात सणांमुळे वाहनांची विक्री ठीक होण्याचा अंदाज आहे. रक्षाबंधन, जन्माष्टमी झाली आहे, गणेश चतुर्थी येत आहे. या राज्यांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री सुरळीत होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...