आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • India To Mine Chinese Empire In E vehicles; It Will Use Aluminum Batteries Instead Of Lithium, Which Is Also Cheaper

दिव्य मराठी विशेष:ई-व्हेईकल्समध्ये चीनच्या साम्राज्याला भारत लावणार सुरुंग; लिथियमऐवजी ॲल्युमिनियम बॅटरीचा वापर करणार, ती स्वस्तही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लिथियम बॅटरीसाठी जग चीनवर अवलंबून, तर भारताकडे ॲल्युमिनियमचा साठा

देवजित चक्रवर्ती/राजेशकुमार सिंह
जगाबरोबरच भारतातही इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार वेगाने वाढत आहे. पण त्यातील लिथियम ऑयन बॅटऱ्यांसाठी संपूर्ण जग बऱ्याच अंशी चीनवर अवलंबून आहे. चीनच्या या साम्राज्याला सुरुंग लावण्याची तयारी भारत करत आहे. भारत अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्यात बॅटरीत मुख्य घटक म्हणून लिथियमऐवजी अॅल्युमिनियमचा वापर होतो. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) अॅल्युमिनियम एअर बॅटरी बनवण्यासाठी फिनर्जी लिमिटेड या इस्रायली स्टार्टअपसोबत काम सुरू केले आहे. आयओसीतील आरअँडडीचे संचालक एस. एस. व्ही. रामकुमार यांनी सांगितले की, लिथियम दुर्मिळ आहे, त्यामुळे आम्ही देशात नैसर्गिकरीत्या मुबलक प्रमाणात उपलब्ध घटकाचा वापर केला आहे. अॅल्युमिनियम बॅटरी लिथियम बॅटरीपेक्षा अनेक बाबतींत सरस ठरेल.

एक तर ती स्वस्त असेल, ती दीर्घ रेंजसाठी वापरता येऊ शकेल, ती जास्त सुरक्षितही असेल. बीएनईएफमधील (लंडन) एनर्जी स्टोअरेजचे प्रमुख जेम्स फ्रिथ म्हणाले की, अॅल्युमिनियमचा पुरवठा लिथियमपेक्षा निश्चितपणे चांगला आहे, पण लिथियमआधारित प्रणालींचे सतत घटते दर त्याला आव्हान देतील. त्यामुळे ऑक्सिजन-एअर टेक्नॉलॉजीला मजबुती देण्यासाठी डेव्हलपर्सना इनोव्हेशन करावे लागेल. जगभरातील अर्ध्या लिथियमवर चीनचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ताबा आहे. २०४० पर्यंत जगातील ५०% वाहने लिथियम बॅटरीवर चालतील. चीन त्या पुरवण्यास उत्सुक आहे. फोर्ब्जनुसार, याबाबत चीन प्रथम स्थानी आहे.

भारत बॉक्साइटच्या प्रमुख १० उत्पादकांत: अशुद्ध बॉक्साइटपासून अॅल्युमिनियम काढले जाते. भारत जगातील अव्वल १० बॉक्साइट उत्पादकांमध्ये आहे. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, भारताकडे ६० कोटी टन अशुद्ध बॉक्साइटचा प्रमाणित साठा आहे.

आयओसीचे ३० हजार फिलिंग स्टेशन बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे काम करतील
अॅल्युमिनियम प्लेटचा हवेत ऑक्सिजनशी संपर्क होतो तेव्हा त्यातून तयार झालेल्या विजेचा वापर करून बॅटरी काम करते. बॅटरीचे सेल रिचार्ज केले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे फिनर्जी नवी बॅटरी देणे आणि रिसायकल करणे यावर काम करत आहे. आयओसीची योजना ३० हजार फिलिंग स्टेशनचा वापर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनच्या रूपात करण्याची आहे.

बातम्या आणखी आहेत...