आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किया सोनेट एक्स लाइन लॉंच:​​​भारतात या कारची किंमत 13.39 लाख; कॉस्मेटिक बदलांसह दोन मॉडेलमध्ये उपलब्ध

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण कोरियातील कार निर्माता कंपनी कियाने आपली नवीन कार Sonet X-Line भारतात लॉंच केली आहे. Kia Sonet X लाइन SUV Kia च्या GTX+ प्रकारावर आधारित असून ही कार एक अद्ययावत आवृत्ती आहे. यात काही कॉस्मेटिक बदलांसह दोन प्रकारात हे मॉडेल उपलब्ध असणार आहे.

Sonet X Line ची किंमत

किया Sonet X लाइनच्या '1.0L Turbo Petrol' प्रकाराची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 13.39 लाख रुपये आहे. त्याचवेळी त्याच्या '1.5 लीटर टर्बो डिझेल' प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे.

एक्स लाइन देखणी अन् जाणून घेऊ डिझाइन

  • Kia Sonet X लाइनची तुलना Kia च्या सर्वात लहान SUV च्या रेग्युलर व्हर्जनशी करा. जी भारतात लॉंच झालेली आहे. त्यामुळे त्यात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
  • सॉनेट एक्स लाइन मॅट ग्रे रंगात आणली गेली आहे. हा रंग भारतात प्रथमच सब-4-मीटर SUV मध्ये सादर करण्यात आला आहे. याला 'टायगर नोज' लोखंडी जाळी, पुढील आणि मागील स्किड प्लेट्स मिळतात. त्याचे बाह्य मिरर ग्लॉस ब्लॅकमध्ये आहेत.
  • फॉग लॅम्पच्या आजूबाजूला गडद क्रोम अ‌ॅक्सेंट आहे. स्किड प्लेट्समध्ये गडद हायपर मेटल हायलाइट्स असतात. Kia Sonet X लाइनमध्ये 16-इंच क्रिस्टल कट ड्युअल-टोन अलॉय व्हील आहेत.
  • सिल्व्हर ब्रेक कॅलिपर X लाइन आवृत्तीमध्ये देखील उपलब्ध आहेत. त्याचवेळी, कारमध्ये शार्क फिन अँटेना आणि नवीन एक्स लाइन बॅजिंग दोन्ही मॅट फिनिश देण्यात आले आहेत.

किया Sonet X LIne अंतर्गत भाग
Kia Sonet X लाइनच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या नवीन ड्युअल-टोन सिल्व्हर सेज थीम देण्यात आली आहे. कारला लेदर सीट्स मिळतात. ज्या नारंगी रंगात शिवल्या गेल्या आहेत. X लाईन लोगो देखील आहेत. तर, त्याचे हेडलाइनर काळ्या रंगाने पूर्ण केले आहे. त्याचवेळी स्टीयरिंग व्हील चामड्याने झाकलेले आहे. ज्याची शिलाई केवळ केशरी रंगात केली गेलेली आहे.

kia sonet x LIne च्या इंजिनबाबत
Kia Sonet X लाइन 1.0-लीटर टर्बो पेट्रोल पॉवरप्लांट आणि 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिनसह ऑफर केली जाते. Sonet X Line चे पेट्रोल इंजिन 118 bhp आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. यात 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. त्याचवेळी त्याचे डिझेल इंजिन 113 bhp आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...