वाहननिर्मिती क्षेत्र / हीरोचे 1500 शोरूम उघडताच 10 हजार दुचाकींची विक्री

  • लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काम सुरू करणारी ही पहिली दुचाकी निर्मिती कंपनी

दिव्य मराठी

May 11,2020 08:40:00 AM IST

नवी दिल्ली. हीरो मोटोकॉर्पने लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नव्याने व्यवहार सुरू करत आपले १५०० रिटेल आऊटलेटस् सुरू केले आहेत. यात गेल्या काही दिवसांत कंपनीने १० हजार मोटारसायकल व स्कूटरची विक्री झाली आहे. दुचाकी वाहननिर्मिती क्षेत्रातील या कंपनीने नियामकांना दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत वितरक व सर्व्हिस आऊटलेटच सुरू करण्यात आले आहेत. यात देशांतर्गत विक्रीमध्ये त्यांचा ३० टक्के वाटा राहिला.


कंपनीने आपल्या प्लँटमधून ७ मे रोजी वाहने पाठवणे सुरू केले आहे. कंपनीच्या युनिटस््मध्ये जगभरात कोरोनामुळे उत्पादन बंद करण्यात आले होते. ४ मे रोजी कंपनीने हरियाणातील धारुहेरा आणि गुरुग्राम तसेच उत्तराखंडमध्ये हरिद्वार या तीन ठिकाणी उत्पादन सुरू केले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काम सुुरू करणारी ही पहिली दुचाकी निर्मिती क्षेत्रातील कंपनी ठरली. कंपनीने या काळात कर्मचारी व ग्राहकांच्या आरोग्याच्यादृष्टीने पूर्ण काळजी घेतली असून नियमांचे पालन केले आहे.

X