आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • Maruti Suzuki's Vehicles Will Become More Expensive This Month, With Some Of The Extra Cost Being Passed On To Consumers| Marathi News

नवी दिल्ली:मारुती सुझुकीची वाहने या महिन्यात महागणार, किंमतवाढ करून अतिरिक्त खर्चाचा काही भाग ग्राहकांवर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्पादन खर्चात वाढ झाल्याने या महिन्यात संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमती वाढवण्यात येणार असल्याचे देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने बुधवारी सांगितले. गेल्या वर्षभरात विविध उत्पादन खर्चात वाढ ‌झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

किंमतवाढ करून अतिरिक्त खर्चाचा काही भाग ग्राहकांवर टाकणे अत्यावश्यक बनले आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. कंपनीने एप्रिलमध्ये किमती वाढवण्याची योजना आखली आहे आणि विविध मॉडेल्ससाठी ही दरवाढ वेगवेगळी असेल.

कंपनीने प्रस्तावित दरवाढीचे प्रमाण उघड केले नाही. उत्पादन खर्चात सतत वाढ झाल्यामुळे मारुतीने आधीच जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत वाहनांच्या किमती सुमारे ८.८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. पोलाद, अॅल्युमिनियम आणि पॅलेडियमसारख्या मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्याने वाहन कंपन्या किमतीत वाढ करत आहेत. वाहनांच्या किमती वाढवण्यामागे मालवाहतूक आणि वाहतूक शुल्क तसेच इलेक्ट्रॉनिक घटकांच्या किमतीत वाढ झाल्याचा उल्लेख वाहन उद्याेगाने केला आहे.

वाहन उत्पादकांनी आपापल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने १ एप्रिलपासून त्यांच्या संपूर्ण मॉडेल श्रेणीच्या किमती ४ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत, जेणेकरून वाढत्या उत्पादन खर्चाचा परिणाम कमी होईल. त्याचप्रमाणे बीएमडब्ल्यू इंडियाने या महिन्यापासून उत्पादनांच्या किमती ३.५ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. ऑडी आणि मर्सिडीज-बेंझसारख्या इतर लक्झरी कार निर्मात्यांनीही १ एप्रिलपासून किमती वाढवल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...