आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रिक यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणू शकते. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. अग्रवाल ट्विट मध्ये म्हणाले की, ओला कंपनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन उत्पादनाची घोषणा करणार आहे. हे पाहता या स्वातंत्र्यदिनी कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणू शकते असे एकंदरीत दिसून येत आहे.
अग्रवालांनी कारबाबत सुरू केला पोल
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये जास्त खुलासा केला नाही. परंतु ओलाने आधीच इलेक्ट्रिक कारमध्ये स्वारस्य दाखवले आहे. सीईओ अग्रवाल यांनीही काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्विट केले होते. 15 ऑगस्टच्या घोषणेबाबत एक पोल देखील त्यांनी सुरू केला आहे. ज्यामध्ये नवीन S1, देशातील स्पोर्ट्स कार, Ola Sail Factory, S1 नवीन आकर्षक रंग, कमी किमत आदी पर्याय आहेत.
जूनमध्ये कारची पहिली झलक पाहायला मिळाली
यंदा ओला कंपनीने जूनमध्ये आपल्या पहिल्या कारची पहिली झलक दाखवली होती. 19 जून रोजी ओला फ्यूचर फॅक्टरी येथे साजरा करण्यात आलेल्या ओलाच्या ग्राहक दिनानिमित्ताने एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता. ज्यामध्ये त्यांनी प्रथमच आपल्या ई-कारची झलक दाखविली होती.
यामध्ये कारचे आकर्षक दिवसा चालणारे दिवे लाल डेंट्ससह दिसतात. टीझरमध्ये ओला लोगोसह कारची पुढील आणि मागील रचना दर्शविली आहे. कार लांब पल्ल्याच्या बॅटरीसह सेडान असू शकते. कंपनी इलेक्ट्रिक कार तयार करण्यासाठी नवीन कारखान्यासाठी एक हजार जागा शोधत आहे. जी होसुरमधील सध्याच्या कारखान्यापेक्षा जवळजवळ दुप्पट असेल. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स होसूर येथील कारखान्यात तयार होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.