आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:तुमच्याकडील कारमध्ये एअरबॅग बसवण्याची गरज नाही, नव्या मॉडेल्समध्ये बंधनकारक; कारच्या किमती महागण्याची शक्यता

नवी दिल्ली/भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात जगाच्या 1% वाहने, मात्र मृत्यूंत वाटा 13%; म्हणूनच एअरबॅगची आवश्यकता

१ जुलै २०१९ पासून कारच्या ड्रायव्हर सीटसाठी एअरबॅग सक्तीची झाली. सरकारने आता चालकाच्या बाजूच्या सीटसाठीही एअरबॅग सक्ती केली आहे. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, १ एप्रिल २०२१ व यानंतर तयार होणाऱ्या सर्व मॉडेल्सच्या नव्या कारमध्ये २ एअरबॅग अनिवार्य असतील. सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या सूचनेनंतर मंत्रालयाने हे पाऊल उचलले. एअरबॅग का गरजेच्या आहेत, हे दै. भास्करने तज्ज्ञांकडून जाणून घेतले.

३१ ऑगस्टची मुदत सध्याच्या मॉडेल्ससाठी आहे, जेणेकरून कार निर्माता कंपन्यांना तयारी करता येईल

वाहनांसाठी एअरबॅग का गरजेची आहे?
जगभरातील १% वाहने भारतात आहेत. मात्र, अपघाती मृत्यूंत भारताचा वाटा १३% आहे. यामुळे एअरबॅग सक्तीची मागणी होत आहे.

माझ्याकडे २०१० चे मॉडेल आहे. मलाही एअरबॅग बसवावी लागेल? ती कुठे व कशी बसवून मिळेल?
आधीच्या कारला एअरबॅग बसवण्याची गरज नाही. १ एप्रिलनंतर तयार होणाऱ्या नव्या मॉडेलमध्ये २ एअरबॅग सक्तीच्या असतील. ३१ ऑगस्ट २०२१ ची मुदत सध्याच्या मॉडेलच्या कारसाठी आहे. जेणेकरून कंपन्यांना तयारी करता येईल.

जुन्या गाडीत एअरबॅग बसवता येईल का?
जुन्या गाडीत एअरबॅग बसवणे कठीण आहे. खर्चही २ ते ३ लाख रुपये येईल. एअरबॅगसाठी गाडी तयार होतानाच सेन्सरचे प्रोग्रामिंग होते.

एअरबॅगमुळे कारच्या किमतीत फरक पडेल?
कार कंपन्या सुटे भाग घाऊकमध्ये खरेदी करतात. यामुळे एक कारसाठी सेन्सर व एअरबॅगचा सरासरी खर्च ३० हजार रुपयांपर्यत असू शकतो. अचानक किमती वाढणार नाहीत, वार्षिक दरवाढ शक्य आहे. कंपन्या सध्या एकच एअरबॅग लावत आहेत. त्यांना मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फार बदलांची गरज नाही.

एअरबॅगमुळे कशा प्रकारे सुरक्षा मिळते?
एअरबॅग कॉटनच्या असतात. त्यावर सिलिकॉन कोटिंग असते. आत सोडियम अझाइड गॅस भरलेला असतो. एअरबॅग २ प्रकारच्या असतात. आयएसआरएस सिस्टिमच्या एअरबॅग छत्रीप्रमाणे उघडून मोठा एरिया कव्हर करतात. एसआरएस एअरबॅग लांब उघडतात. देशात सध्या पहिल्या प्रकाराच्या एअरबॅग जास्त सुरक्षित समजल्या जातात.

एअरबॅग कशा प्रकारे काम करतात?
वाहन धडकल्याच्या सेकंदापेक्षाही कमी वेळेत एअरबॅग उघडून प्रवाशाचे डोके व बरगड्यांना सुरक्षा देते. यामुळे शरीर डॅशबोर्डाला धडकत नाही. मात्र, एअरबॅगसाठी सीट बेल्ट अनिवार्य असते. ते लावलेले नसेल तर एअरबॅगमुळेच इजा होते. मानेचे हाड मोडू शकते.

३१ ऑगस्ट २०२१ नंतर एअरबॅग नसेल तर काय?
अशा वाहनांचे नोंदणीकरण केले जाणार नाही.

नवे नियम कारसारख्या प्रवासी वाहनांनाच काय?
आता लाइट कमर्शिअल वाहनांतही एअरबॅग सक्तीची मागणी होत आहे. कारण यातील अनेक चालक रात्री गाडी चालवतात व अपघातांना बळी पडू शकतात.

देशात सिंगल एअरबॅगयुक्त किती वाहने आहेत?
देशात सद्य:स्थितीत १८० पेक्षा अधिक व्हेरियंट आणि मॉडेल्स सिंगल, डबल किंवा त्यापेक्षा अधिक एअरबॅग बसवून येत आहेत.

जितेंद्र दुबे, ऑटोमोबाइल एक्स्पर्ट
टूटू धवन, ऑटोमोबाइल एक्स्पर्ट
पीयूष तिवारी, रोड सेफ्टी एक्स्पर्ट

बातम्या आणखी आहेत...