आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • Now The Trend Has Changed, Demand For TVs With Screens Larger Than 40 Inches Has Tripled In 5 Years | Marathi News

विक्रीत वाढ होण्याची शक्यता:आता ट्रेंड बदलला, 40 इंचांपेक्षा मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीची मागणी 5 वर्षांत तिप्पट

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षात मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या किमती कमी झाल्या आहेत. या दरम्यान कोविड महामारीच्या काळात लोकांची टीव्ही बघण्याची सवयही खूप बदलली आहे. तसेच उत्पन्न आणि इंटरनेटचा वापर वाढण्यासोबत ओटीटी स्ट्रीमिंग वाढल्याने लोक मोठ्या स्क्रीनची टीव्ही घेणे पसंत करू लागले आहेत.

यामुळे गेल्या ५ वर्षात ४० इंचापेक्षा मोठ्या टीव्हीची मागणी तिप्पट वाढली आहे. आता देशात टीव्हीच्या एकूण विक्रीत मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा वाटा ४०% झाला आहे. संशोधन संस्था क्रिसिल रिसर्चच्या ताज्या अहवालात माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या किमतीत काही वर्षात ३५--४०% ची घट बघायला मिळाली आहे. २०१७-१८ मध्ये ५५ इंच टीव्हीची किंमत १ लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त होती आता ती कमी होऊन ५५ हजार झाली आहे. ४३ इंचापेक्षा जास्त मोठ्या स्क्रीनमध्येही स्पर्धा खूप जास्त आहे. अहवालानुसार ५-७ वर्षांपूर्वी २५-३० ब्रँड होते तर आता जवळपास ७० ब्रँड या गटात स्पर्धा करत आहेत.

पाच वर्षांत १०% वाढेल मागणी
क्रिसिल रिसर्चचे संचालक पूषन शर्मा यांच्या नुसार, टीव्हीच्या किमती घटण्यासह गेल्या काही वर्षात देशात दरडोई उत्पन्न ११% पर्यंत वाढले आहे. या दरम्यान टीव्हीच्या किमतीत ३५-४०% घट झाली आहे. २०१७ पर्यंत एकूण मागणीत मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीचा वाटा ५०% पर्यंत होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...