आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल बंगळुरूमध्ये 500 एकरांवर उभारताहेत सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना

बंगळुरूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक, 10 हजार बेरोजगारांना मिळणार काम

ओला टॅक्सी सेवेचे संस्थापक भाविश अग्रवाल बंगळुरूनजीक ५०० एकर विस्तीर्ण जागेवर जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर कारखाना उभारत आहेत. वर्षभराच्या आत २० लाख स्कूटरचे उत्पादन करण्याचा भाविश अग्रवाल यांची संकल्प आहे. भारतातील सर्वात मोठे स्टार्टअप असल्याचे सांगितले जाते. भाविश अग्रवाल या महाकाय कारखान्यासाठी २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. टेस्ला आणि निअोसारख्या अव्वल बहुराष्ट्रीय कंपन्यांचा बोलबाला असलेल्या बाजारपेठेत आता ओला-इलेक्ट्रिक ई-व्हेइकल ही कंपनी उतरणार आहे. तथापि, आपल्या प्रकल्पाची सुरुवात ते दुचाकी वाहनांनी करणार आहेत.

पुढील दहा वर्षात देशातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ १४.६ लाख कोटींवर जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे लाॅकडाऊन आणि नंतर पुन्हा कोरोनाने उचल खाल्ल्यामुळे आधीच मंदी असल्याने ओला टॅक्सीच्या उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भाविश अग्रवाल यांनी ई-व्हेइकलच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात सध्या तरी पेट्रोलवर धा‌वणाऱ्या स्कूटर आणि मोटारसायकल सर्वात लोकप्रिय आहेत परंतु इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे.

३००० रोबोट दर २ सेकंदाला बनवणार स्कूटर
ओला-इलेक्ट्रिक या कारखान्यात ३,००० पेक्षा अधिक रोबोट काम करणार आहेत. या रोबोटसोबत १० हजारपेक्षा अधिक कामगार काम करणार आहेत. १ हजारपेक्षा अधिक इंजिनिअर्सच्या टीमने सॉफ्ट‌वेअर तयार केले आहे. कारखान्याच्या छतावर सौरऊर्जेचे पॅनल बसवले जाणार असून त्यामुळे कार्बन उत्सर्जन टळणार आहे. ई -स्कूटरला लागणारे कंपोनंट तयार करण्यासाठी सप्लायर पार्कही बनवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...