आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Google Pixel 6a ची प्री बुकिंग सुरू:6 GB RAM, लाइव्ह ट्रान्सलेशन सारखे फिचर्स, बुकिंगला ग्राहकांची चार हजारांची होईल बचत

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलचा पिक्सेल स्मार्टफोन Pixel 6a भारतीय बाजारात लवकरच दाखल होणार आहे. तर आता ग्राहक भारतात प्री ऑर्डर करू शकतात. गुगलच्या या फोनची विक्री 28 जुलै पासून सुरू होणार आहे. ब्रँडने मे महिन्यात झालेल्या (I/O) (annual developer conference) कार्यक्रमात हे उपकरण सादर केले आहे. तत्पूवी कंपनीने 2020 मध्ये Pixel 4a लॉन्च केला होता. Pixel स्मार्टफोन व्यतिरिक्त, तुम्ही Pixel Buds आणि अन्य Google डिव्हाइस देखील खरेदी करू शकता. Google Pixel 6a हा कंपनीच्या 6-सीरीजमधील सर्वात स्वस्त फोन असणार आहे.

Google Pixel 6a ची किंमत

Google Pixel 6a ची किंमत 43,999 रुपये आहे. तर प्री-बुकिंग दरम्यान, तुम्ही हा फोन 39,999 रुपयांना खरेदी करू शकता. Axis Bank कार्ड आणि EMI व्यवहारांवर ग्राहकांना 4 हजारांची सुट मिळणार आहे. भारतात हा फोन चारकोल आणि चॉक या दोन रंगांच्या पर्यायांत येणार आहे. Google या डिव्हाइसवर 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. ही ऑफर Pixel उपकरणांसाठी आहे. दुसरीकडे, तुम्ही इतर फोनच्या एक्सचेंजवर दोन हजार रूपयांपर्यंत बचत करू शकता. जर एखाद्याने या फोनसह Nest Hub Gen 2 किंवा Pixel Buds A सीरीज किंवा Fitbit Inspire 2 खरेदी केला. तर त्याला फक्त 4,999 रुपये खर्च करावे लागतील. तुम्ही फ्लिपकार्टवरून 19,990 रुपयांना Pixel Buds Pro खरेदी करू शकता.

फोटो ओळ - युजर्सच्या सुरक्षेला लक्षात घेऊन 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्यात आले आहे.

Google Pixel 6a चे तपशील

Google Pixel 6a मध्ये 6.1-इंचाची FHD + OLED स्क्रीन आहे, जी 90Hz रिफ्रेश रेट आहे. हँडसेट टेन्सर GS101 चिपसेटवर काम करतो, जो इतर Pixel 6-सीरीज फोनमध्ये आहे. डिव्हाइस 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह येतो. Google Pixel 6 ला लाइव्ह ट्रान्सलेशनचे फीचर मिळेल, जे मेसेज ते WhatsApp आणि Instagram पर्यंत सपोर्ट करेल. जर तुम्ही इंस्टाग्रामवर परदेशी भाषेचा व्हिडिओ पाहत असाल तर त्या भाषेचे वास्तविक वेळेत भाषांतर करेल. यात ड्युअल रिअर कॅमेरा आहे. ज्याची मुख्य लेन्स 12MP आहे. दुसरा 12MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. समोर 8MP सेल्फी कॅमेरा आहे. डिव्हाइस Android 12 सह येते. यात 4,306 mAh ची बॅटरी आहे. जी जलद चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट टायटन एम 2 चिपवर काम करतो. आतापर्यंत Google 6a वर उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलले गेले आहे. आता आपण समजून घेऊया की या किंमतीत हा फोन रिजनेबल आहे का? आणि त्यात काय सापडणार नाही?

डिस्प्ले बाबतीत निराशा
Google ने Google 6a सह डिस्प्लेच्या बाबतीत निराश केले आहे. 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये, तुम्हाला अनेक फोन सापडतील ज्यामध्ये 120Hz आणि 144Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले उपलब्ध आहेत. आता Google ने 60Hz रिफ्रेश रेटसह काय डिस्प्ले दिला आहे. याचा विचार केला तर फक्त त्यालाच माहिती आहे. 40 हजार रुपये खर्चून 60Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असलेला फोन खरेदी करण्यात काही अर्थ नाही.

कॅमेरा सुविधा महत्त्वाची नाही
आज फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरे सहज सापडतात. अशा परिस्थितीत गुगलने या फोनसोबत ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. आजकाल, अगदी बजेट फोनमध्येही तिसरा लेन्स म्हणून मॅक्रो सेन्सर मिळत आहे, तर Google Pixel मध्ये तुम्हाला मॅक्रो सेन्सरसारखे काहीही मिळत नाही. फ्रंट कॅमेरा देखील फक्त 8 मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो. तर सर्व कंपन्यांनी 12, 20 आणि 32 मेगापिक्सल्सवर शिफ्ट केले आहे. Apple ने i-Phone 13 मालिकेत 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे.

संरक्षणा बाबत निराशा
गुगलने संरक्षणाच्या बाबतीतही निराशा केली आहे. Gorilla Glass 3 2013 मध्ये लाँच झाला होता. आणि आज Gorilla Glass Victus चा जमाना आहे. पण इथेही Google ने Gorilla Glass 3 च्या संरक्षणात कमीपणा आणला आहे. याशिवाय प्रीमीयम फोन असूनही बॅक पॅनलला प्लास्टिक देण्यात आले आहे. अशा स्थितीत गोरिला ग्लासचे संरक्षण फक्त समोरील बाजूस उपलब्ध आहे. फोनला IP67 रेटिंग मिळाली आहे.

चार्जिंग क्षमता
Pixel 6a जलद चार्जिंगसाठी समर्थनासह 4410mAh बॅटरी पॅक करते आणि फक्त 18W पर्यंत सपोर्ट करते. आज, जेव्हा 150W पर्यंत चार्जिंग असलेले फोन बाजारात उपलब्ध आहेत, तेव्हा 18W चार्जिंगसह फोन लॉन्च करणे एक विनोदी वाटते. अॅपल आणि सॅमसंगच्या मार्गावर चालत गुगलनेही फोनसोबत बॉक्समध्ये चार्जर दिलेला नाही.

किमतीची या सर्व गोष्टी असूनही कंपनीने फोनच्या किंमतीबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही. iPhone SE पासून OnePlus, Realme, Vivo, iQoo आणि Samsung पर्यंत 40 हजार रुपयांच्या रेंजमध्ये अनेक चांगले फोन आहेत.

बातम्या आणखी आहेत...