आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन प्रकल्प:मारुतीच्या मानेसर प्रकल्पात उत्पादन सुरू, 50 दिवस हाेते बंद

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • मारुतीचा गुरुग्राम प्रकल्प अद्यापही बंद

लाॅकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये वाहन कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरू झाले आहेत. देशातील सर्वात माेठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने देखील आपला मानेसर प्रकल्पातील उत्पादन सुरू केले आहे. मारुतीचे मानेसर आणि गुरुग्राम प्रकल्पातील उत्पादन २२ मार्चपासून बंद करण्यात आले हाेते.

मानेसर प्रकल्पात उत्पादन सुरू झाले असून पहिली कार मंगळवारी तयार हाेणार आहे. सध्याच्या काळात ७५ टक्के कर्मचाऱ्यांच्या मदतीने एकाच पाळीमध्ये उत्पादन सुरू केले आहे. परंतु, पूर्ण क्षमतेने काम सुरू करणे नियमांवर अवलंबून असेल, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी सांगितले.

मारुतीचा गुरुग्राम प्रकल्प अद्यापही बंद

मारुतीचा गुरुग्राम प्रकल्प अद्यापही बंद आहे. त्या बाबत भार्गव म्हणाले, ताे उत्पादन प्रकल्प सुरू हाेईल. हरियाणा सरकारने २२ एप्रिलला मानेसर प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली हाेती. परंतु, उत्पादनातील निरंतरता व वाहनांची विक्री हाेईल त्याचवेळी उत्पादन सुरू करता येऊ शकेल. लाॅकडाऊनमुळे एप्रिलमध्ये मारुती सुझुकीच्या एकाही कारची विक्री हाेऊ शकली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...