आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Auto
  • Record Sales Of Tesla Cars Put Many Big Companies In Crisis, Selling 9.36 Million Cars In 2021 | Marathi News

ऑटोमोबाइल:टेस्ला कारच्या विक्रमी विक्रीने अनेक मोठ्या कंपन्या संकटात, 2021 मध्ये 9.36 लाख कारविक्री

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी जनरल मोटर्स, फोर्ड मोटरसह प्रस्थापित ऑटो उत्पादक आणि इतर प्रस्थापित ऑटो निर्मात्यांना संगणक चिप्सच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. जीएम, फोर्डला एकामागून एक अनेक प्लांट बंद करावे लागले. असे असले तरी टेस्ला इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनीने २०२१ मध्ये विक्रमी ९ लाख ३६ हजार कार विकल्या आहेत. २०२० च्या तुलनेत यात ८७ टक्के वाढ झाली आहे. फोर्ड, जीएम आणि क्रिस्लर, फियाट, प्युगो यांच्या विलीनीकरणामुळे स्थापन झालेल्या स्टेलांटिस कंपनीची विक्री २०२१ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत कमी होती.

कार उत्पादनासाठी महत्त्वाची उपकरणे उभारण्याची टेस्लाची क्षमता सूचित करते की, फॉक्सवॅगन, जीएमसारख्या दिग्गजांना धोका निर्माण होऊ शकतो. टेस्लाला हव्या असलेल्या चिप्स मिळाल्या नाहीत तेव्हा त्यांनी बाजारात उपलब्ध कोणतीही चिप मिळवली व ती चालवण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले. मोठमोठ्या ऑटोमोबाइल कंपन्या हे करू शकल्या नाहीत. त्या त्यांच्या सॉफ्टवेअर आणि संगणनासाठी बाह्य स्रोतांवर अवलंबून होत्या. काही वर्षांपूर्वी इलॉन मस्क यांनी ठरवले की, टेस्ला बहुतेक महत्त्वाची कामे स्वतःच करेल. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जन्मलेल्या टेस्लाने कधीही सॉफ्टवेअर आयात केले नाही, असे पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील व्हार्टन स्कूलचे प्राध्यापक मॉरिस कोहन म्हणतात. चिप्ससाठी कंपनीने स्वतःचे सॉफ्टवेअर बनवले आहे.

कार अधिक डिजिटल होत आहेत. इंजिन-इंधन उत्सर्जनासह सॉफ्टवेअर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. काही जुन्या कार कंपन्यांना आता हे वास्तव कळू लागले आहे. टेस्लाप्रमाणे आपल्याला करावे लागेल, हे इतर कार कंपन्यांना समजले आहे. त्यांनी संगणक प्रणालीवर काम सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...