आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुकेश अंबानींच्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओसाठी ट्रायने जारी केलेल्या डिसेंबर 2021 चे आकडे चांगले नव्हते. ट्रायने जारी केलेल्या यादीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये 12.9 मिलियन (1.29 कोटी) ग्राहकांनी देशातील सर्वात मोठी कंपनी जिओ सोडली आहे. दुसरीकडे, बीएसएनएलने 1.1 मिलियन (11 लाख) आणि भारती एअरटेलने 0.47 मिलियन (4.70 लाख) जोडले. त्याचवेळी, 16 लाख यूजर्स व्होडाफोन आयडिया (Vi) पासून वेगळे झाले.
BSNL ला झाला फायदा
मार्केट शेअरच्या बाबतीत, रिलायन्स जिओकडे 36%, त्यानंतर भारती एअरटेल 30.81%, व्होडाफोन आयडिया 23%, BSNL आणि MTNL चे अनुक्रमे 9.90% आणि 0.28% आहेत. बीएसएनएलने या महिन्यात प्रभावीपणे सर्वाधिक ग्राहक जोडले आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा टेलिकॉम कंपनी 4G नेटवर्क लॉन्च करेल, तेव्हा अधिक लोक त्याकडे जाऊ शकतात. BSNL कडे सध्या देशभरात 4G नाही. मात्र, स्वस्त दराचा फायदा कंपनीला मिळाला आहे. डिसेंबरमध्ये, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने नवीन डेटा योजना लागू केल्या.
85.4 लाख यूजर्सने नंबर केले पोर्ट
डिसेंबरमध्ये 8.54 मिलियन (85.4 लाख) मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी करण्यात आली. त्यापैकी 4.91 मिलियन विनंत्या झोन-1 मधून आल्या आणि उर्वरित 3.63 दशलक्ष विनंत्या झोन-2 मधून आल्या. MNP झोन-1 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विनंत्या आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये MNP झोन-2 मध्ये सर्वाधिक MNP विनंत्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.