आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटो:मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाईची विक्री जानेवारीत 25 टक्क्यांपर्यंत वाढली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाहन कंपन्यांसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली राहिली. जानेवारी २०२१ मध्ये मारुती सुझुकी इंडियाची विक्री ४.३ टक्के, ह्युंदाईची विक्री १६ टक्के आणि टाटा मोटर्सची विक्री २५ टक्के वाढली आहे. मात्र, यादरम्यान महिंद्रा अँड महिंद्राची (एमअँडएम) २५ टक्के घटली. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने जानेवारीत एकूण १,६०,७५२ गाड्या विकल्या. ही जानेवारीत १,५४,१२३ वाहनांच्या विक्रीपेक्षा ४.३ टक्के जास्त आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने जानेवारीमध्ये ६०,१०५ गाड्या विकल्या. गेल्या जानेवारीत विकलेल्या ५२,००२ गाड्यांपेक्षा १५.६ टक्के जास्त आहे. टाटा मोटर्सची जानेवारीत एकूण विक्री २५.२७ टक्के वाढून ५९,९५९ गाड्या झाली.

गेल्या वर्षी समान महिन्यात कंपनीने ४७,८६२ गाड्या विकल्या होत्या. एमअँडएमची जानेवारीत विक्री २५ टक्के घटून ३९,५४६ गाड्या राहिल्या. जानेवारी २०२० मध्ये कंपनीने ५२,५४६ गाड्या विकल्या. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात कंपनीच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४ टक्के आणि निर्यातीत ३० टक्के वाढ झाली. होंडा कार्स इंडियाची विक्री जानेवारीत दुप्पट होऊन ११,३१९ पर्यंत पोहोचली. जानेवारी २०२० मध्ये कंपनीने ५,२९९ गाड्या विकल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...