आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी विक्रीच्या बाबतीत स्प्लेंडर प्रथमस्थानी:​​​जुलैत 2.50 लाख गाड्यांची विक्री; द्वितीय क्रमांकावरील होंडा अ‌ॅक्टिव्हाची 2.13 लाख विक्री

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिरो स्प्लेंडर जुलै 2022 मध्ये सर्वाधिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थानावर राहीली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 2,50,409 युनिट्सची विक्री केली. त्यापाठोपाठ होंडा अ‍ॅक्टिव्हा 2,13,807 युनिट्स विकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन दुचाकींशिवाय, बजाज, टीव्हीएस आणि सुझुकी वाहनांचाही टॉप-10 दुचाकी विक्रीच्या यादीत समावेश आहे. आम्‍ही तुम्‍हाला जुलै-2022 च्या टॉप-10 सर्वाधिक विक्री झालेल्या दुचाकीबद्दल सांगत आहोत.

जुलै महिन्यात विक्री झालेल्या टॉप टेन दुचाकी

क्रमांकगाडीची कंपनीकिती युनिट्सची विक्रीवार्षिक वाढ
1हीरो स्प्लेंडर2,50,409-0.15%
2होंडा अ‌ॅक्टिवा2,13,80731%
3होंडा CB शाईन1,14,663-1%
4बजाज पल्सर1,01,90557%
5हीरो HF डीलक्स97,451-8%
6टीवीएस जुपिटर62,09463%
7बजाज प्लॅटीना48,484-11%
8

सुझुकी एक्सेस

41,440-12%
9होंडा डिओ36,22976%
10टीवीएस एक्स एल32,117-35%

हिरो स्प्लेंडर एकाधिक पर्यायांमध्ये उपलब्ध
कंपनी विविध इंजिन पर्यायांसह हिरो स्प्लेंडर विक्री करीत आहे. स्प्लेंडर प्लस हे त्याचे सर्वात लोकप्रिय आणि परवडणारे मॉडेल आहे. त्याची किंमत 70,658 रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते. याशिवाय सुपर स्प्लेंडर, स्प्लेंडर आय-स्मार्ट, स्प्लेंडर, Splendor + Xtec सारखे मॉडेल देखील कंपनीकडे उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...