आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PDF मधून पासवर्ड हटवण्याची प्रोसेस:कंम्प्यूटर किंवा लॅपटॉपवर PDF फाइल ओपन करा, नंतर प्रिंट कमांड देऊन सेव्ह अ‍ॅज PDF म्हणून सेव्ह करा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हाही आपण आधार कार्ड डाउनलोड करतो तेव्हा ते पासवर्डने सुरक्षित असते. त्याचप्रमाणे बँक स्टेटमेंट किंवा क्रेडिट कार्ड बिल देखील पासवर्ड संरक्षित असते. या सर्व PDF फाईल्स असतात. जेव्हा आपण या PDF शेअर करतो तेव्हा पासवर्ड देणेही आवश्यक असते. या प्रकरणात, तुम्ही PDF चा पासवर्ड रिमूव्ह करु शकता.

पासवर्ड हटवण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या कामाला 1 मिनिटही लागणार नाही.

PDF मधून पासवर्ड हटवण्याची प्रोसेस

  • पीडीएफ फाइल गुगल ड्राइव्ह, क्रोम किंवा संगणक किंवा लॅपटॉपवरील कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये उघडा.
  • जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फाइल उघडता तेव्हा तुम्हाला त्यात पासवर्ड टाकावा लागेल.
  • फाईल उघडल्यावर त्यात प्रिंट कमांड (Ctrl + P) द्यावी लागेल.
  • आता प्रिंटर ऑप्शनवर जा आणि 'Save as PDF' वर टॅब करा.
  • अशा प्रकारे तुम्ही पासवर्डशिवाय डुप्लिकेट पीडीएफ फाइल सेव्ह कराल.
बातम्या आणखी आहेत...