आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शांतीत क्रांती:इलेक्ट्रिक कारचा आवाजच येत नसल्याने लोकांना कळावे म्हणून संगीतकार साउंड तयार करणार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑइल, स्पार्क प्लग, फ्युएल फिल्टर, फ्ल्यूड व मेंटेनन्सची गरज नाही

स्टीफन विल्यम्स
काही वर्षांत भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची गर्दी वाढणार आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मितीच्या शर्यतीत आहेत. चार्जिंग स्टेशनचाही आराखडा तयार होत आहे. दरम्यान, जनरल मोटर्सने गेल्या आठवड्यात सन २०३५ पासून फक्त इलेक्ट्रिक कार निर्मितीची घोषणा केली. यामुळे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाइल इंडस्ट्री दबावात आली. इतर कार कंपन्याही आता असेच बदल करत आहेत.
इलेक्ट्रिक वाहने महागडी असली तरी पर्यावरणपूरकता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मात्र या कारमुळे अनेक आश्चर्यकारक बदल दिसतील. उदा. या कार इतक्या शांततेने धावतात की त्या आजूबाजूला आहेत, हे लोकांना जाणवून देण्यासाठी नवा साउंडच तयार करावा लागणार आहे. यामुळे ऑडीच्या आगामी ई-ट्रॉन जीटी कारमधील विशेष साउंड इफेक्ट वेगाची सूचना देईल. त्यातील कंट्रोल युनिट वेगानुसार साउंड रिमिक्स करेल. ऑडीतच अकॉस्टिक व्हेइकल अलार्मिंग सिस्टिमही असेल.

तो पादचाऱ्यांना त्यांच्याजवळून इलेक्ट्रिक वाहन जात आहे, याचा इशारा देईल. बीएमडब्ल्यूनेही त्यांच्या आय-४ कारचा ऑटोमोटिव्ह साउंडट्रॅक तयार करण्यासाठी संगीतकार हॅन्स िजमरसोबत करार केला आहे. मर्सिडीज-बेंझ, जग्वार, निसानसारख्या कंपन्याही अशा प्रोजेक्ट्सवर काम करत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांबाबत दुसरा मोठा बदल मेंटेनन्समध्ये येईल. तुम्हाला वारंवार गॅरेजला जाण्याची गरज नसेल. इलेक्ट्रिक वाहनांत ऑइल, स्पार्क प्लग, फ्युएल फिल्टर, फ्ल्यूड व रूट मेंटेनन्सची गरज नसते. यामुळे मेकॅनिकवर राेजगाराचे संकट ओढवू शकते. मात्र, शिकागोतील ऑटोमोटिव्ह मेंटेनन्स अँड रिपेअर असोसिएशनचे अध्यक्ष जेफ्री कॉक्स म्हणाले, ‘वाहनांच्या मेंटेनन्सची बाजारपेठ कायम राहील. तुम्हाला तांत्रिक ज्ञान असलेल्या लोकांची भरती करावी लागेल. ’

टायरचे घर्षण कमी करण्याचे निर्मात्यांपुढे आव्हान ऑडीचे प्रवक्ते मार्क देहान्क म्हणाले, ईव्ही कारसाठी ब्रेक्स, अॅक्सल व सस्पेन्शन मजबूत करावे लागेल. टायर कंपनीचे अधिकारी इयान कोक म्हणाले, टायरचे घर्षण कमी करण्याचे मोठे आव्हान आहे. सिलिकाचा वापर करून टायरसाठी खर्च होणारी ऊर्जा कमी करता येईल.