आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाने कारला 3 फूट मागे ओढले:आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ, म्हणाले- महिंद्रा कार खूप स्वादिष्ट

नवी दिल्ली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंगलामधील रस्त्यावर एक SUV कार दिसत आहे, तिच्या मागचा बंपर वाघ त्याच्या जबड्याने खेचत आहे. वाघाच्या जबड्याची पकड इतकी जबर होती की, कार 3 ते 4 फूट मागेही ओढली गेली. यादरम्यान कारच्या मागील बंपरचेही नुकसान झाले. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ सुमारे दीड मिनिटांचा असून बंगाल टायगरची खरी ताकद या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. महिंद्रा झायलोच्या मागील बंपरला पकडून हा वाघ मागे खेचत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एवढेच नाही तर हा वाघ या महिंद्रा झायलोवर अनेक ठिकाणी ओरबाडण्याचाही प्रयत्न करतो. आश्‍चर्याची बाब म्हणजे या कारमध्ये अनेक जण होते.

वाघाने जवळपास 2 टन वजन खेचले
आता तुम्ही बंगाल टायगरच्या ताकदीचा अंदाज यावरून लावू शकता की, महिंद्रा झायलोचे कार्ब वजन 1875 किलो आहे आणि या महिंद्रा झायलोमध्ये एकूण 6 लोक बसले होते. यामुळे हा बंगालचा वाघ सुमारे 2000 किलो म्हणजे सुमारे 2 टन वजन खेचत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिंद्रा झायलोची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज झाली होती, त्यामुळे ती सुरू होत नव्हती.

बॅटरी बिघडल्याने कार बंद पडली होती
अशा स्थितीत गाडीत बसलेल्या लोकांनाही त्यातून बाहेर पडता येत नव्हते आणि आजूबाजूला अनेक वाघ असल्याने गाडीला धक्काही लावता येत नव्हते. बॅटरीच्या समस्येमुळे कार थोडक्यात बंद झाली आणि ड्रायव्हरला ती पुन्हा सुरू करता आली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जानेवारी महिन्याचा आहे. जे तेथून जाणाऱ्या एका पर्यटकाने टिपले. हे नुकतेच आनंद महिंद्रा यांनी शेअर केले आहे.

बातम्या आणखी आहेत...