आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनक्षेत्रात दिलासा:ऑक्टोबरमध्ये 5% वाढली वाहनांची विक्री, आणखी वाढीची शक्यता

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनलॉक सुरू झाल्यानंतर सलग सहाव्या महिन्यात कारच्या विक्रीत वाढ

अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यापासून वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ महिना-दर महिन्यास सुरू आहे. ऑक्टोबरमध्येही सप्टेंबरच्या तुलनेत ५ टक्क्यांहून जास्तीची वाढ नाेंदली आहे.

नोव्हेंबरमध्ये दिवाळी आणि धनत्रयोदशीमुळे वाहनांच्या विक्रीत कमीत कमी १० टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन्सने (फाडा) सोमवारी वाहनांच्या विक्रीसंबंधीचा अहवाल जारी केला आहे.

सप्टेंबर महिन्यात एकूण १४,१३,५४९ वाहनांची नोंदणी झाली आहे. सप्टेंबरमध्ये १३,४४,८६६ वाहनांची नोंदणी झाली. याच पद्धतीने ६८,६८४ वाहनांची जास्त नोंदणी झाली. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि फाडाच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात वाहनांच्या विक्रीत वाढ होणे चांगले संकेत आहेत. मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत या वर्षी ट्रॅक्टर वगळता वाहनांच्या विक्रीत घट नोंदली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ३५,४५६ ट्रॅक्टरची मागणी राहिली, या वर्षी ही ५५.५३ टक्के वाढून ५५,१४६ झाली आहे. फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नवरात्र, धनत्रयोदशी आणि दिवाळी सर्व सण होते, त्यामुळे बाजार चांगला गेला होता. या वर्षी नोव्हेंबरमध्ये धनत्रयोदशी आणि दिवाळी दोन्ही आहे, त्यामुळे नोव्हेंबरमध्येही चांगल्या विक्रीची अपेक्षा आहे. देशातील दुसरी सर्वात मोठी कार कंपनी ह्युंदाई मोटर्सचे संचालक, सेल्स अँड मार्केटिंग तरुण गर्ग म्हणाले, सणासुदीत वाहनांच्या बाजारात उसळी येईल असा विश्वास आहे. गेल्या महिन्यात बाजारात ग्राहकांचा चांगला कल दिसला.

टोयोटाचे मार्केटिंग अँड सेल्स विभागाचे उपाध्यक्ष नवीन सोनी म्हणाले, देशात धनत्रयोदशीमध्ये नवीन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. या दिवशी वाहनांची बरीच खरेदी होते. कंपनीकडे गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात १३ ते १५ टक्के जास्त चौकशी झाली. त्यामुळे वाहनांची विक्री १५ टक्क्यांपर्यंत होईल, अशी आशा आहे.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी आणि ह्युंदाईने याआधीच घोषणा केली की, त्यांच्यासाठी ऑक्टोबर महिना आतापर्यंतचा सर्वात अधिक विक्रीचा महिना राहिला आहे. जगातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती हीरो मोटोकॉर्प आणि तिची स्पर्धक कंपनी बजाज ऑटोनेही ऑक्टोबरमध्ये विक्रमी विक्री केली आहे.

बातम्या आणखी आहेत...