आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • 10 Companies Including Maruti, Tata Will Increase The Price To Buy Expensive Car From Next Year

पुढच्या वर्षीपासून कार खरेदी करणे महागणार:मारुती, टाटासह 10 कंपन्या वाढवणार किंमती, जाणुन घ्या कोणत्या ब्रांडमध्ये किती टक्के होणार वाढ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मारुती सुझुकी, टोयोटा, स्कोडा आणि टाटा सारख्या अनेक कार कंपन्यांनी जानेवारी 2022 पासून त्यांच्या मॉडेल्सची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. मात्र, कार कंपन्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच किमती वाढवणे ही नवीन गोष्ट नाही. सर्व कंपन्यांनी एक्सचेंज रेटमध्ये चढउतार आणि रॉ मटेरियलच्या वाढत्या इनपुट कॉस्टचे कारण दिले आहे. चला तर मग एक नजर टाकूया त्या सर्व कंपन्यांवर ज्या पुढील वर्षापासून किंमत वाढवणार आहेत.

1.मारुती सुझुकी
मारुती सुझुकीने सर्वप्रथम जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती सर्व मारुती एरिना आणि नेक्सा मॉडेल्सना लागू होतील, परंतु मॉडेलनुसार भिन्न असतील. मारुतीने अद्याप मॉडेलनुसार दरवाढीची घोषणा केलेली नसली तरी, 31 डिसेंबरपूर्वी अपडेटेड किमती जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे 2021 मध्येच मारुतीने आपल्या मॉडेल्सची किंमत 3 वेळा वाढवली आहे. कंपनीने जानेवारीमध्ये पहिल्यांदा, एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा आणि सप्टेंबरमध्ये तिसऱ्यांदा किंमत वाढवली होती.

2.होंडा
होंडाही पुढील महिन्यापासून आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की वाढत्या इनपुट आणि कमोडिटी खर्चाचा अभ्यास केल्यानंतर, ते ठरवतील की, वाहनांवर खर्च होणाऱ्या कॉस्टचा कितवा भाग ग्राहकांना द्यायचे हे ठरवेल. येत्या काही दिवसांत अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. या दरवाढीचा परिणाम भारतातील होंडाच्या सर्व मॉडेल्सवर होण्याची अपेक्षा आहे.

3.टाटा मोटर्स
टाटा मोटर्सने जानेवारी 2022 पासून त्यांच्या संपूर्ण वाहनांच्या पोर्टफोलिओमध्ये दरवाढीची घोषणा केली आहे. यामध्ये कॉमर्शियल आणि प्रवासी वाहनांचा समावेश आहे. टाटाने त्यांच्या व्यावसायिक वाहनांसाठी 2.5% वाढ केली आहे. त्यांच्या सर्व मॉडल्सवर लागू होईल. यामध्ये इलेक्ट्रिक आणि ICE पॉवर आणि नव्याने लाँच झालेल्या टाटा पंचचाही समावेश आहे. त्याचबरोबर कंपनीने पॅसेंजरमध्ये किती किंमत वाढवली जाईल याचा खुलासा केलेला नाही.

4.रेनो
रेनो देखील जानेवारीपासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहे. भारतात सध्या रेनोच्या चार मॉडेल्स विकल्या आहेत. यामध्ये Kwid, Triber, Keeger आणि Duster यांचा समावेश आहे.

5.टोयोटा
जानेवारी 2022 पासून टोयोटाच्या सर्व वाहनांच्या किमतीही महाग होणार आहेत. टोयोटाने देखील मॉडेलनुसार दरवाढ जाहीर केलेली नाही, परंतु ती सर्व मॉडेल्सना लागू होईल असे सांगितले आहे. ज्याच्या किमती मॉडेलनुसार बदलण्याची अपेक्षा आहे. टोयोटा सध्या भारतात इनोव्हा क्रिस्टा, फॉर्च्युनर आणि बॅज-इंजिनियर अर्बन क्रूझर आणि ग्लान्झा विकते.

6.स्कोडा
स्कोडाच्या भारतात विकल्या जाणार्‍या कुशक, ऑक्टाव्हिया आणि सुपर्ब मॉडेल्सच्या किमतीत जानेवारी 2022 पासून 3% वाढ होईल. कंपनीने म्हटले आहे की, त्यांनी 2021 मध्ये फक्त एकदाच आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत.

7.वोक्सवॅगन
वोक्सवॅगनने 1 जानेवारी 2022 पासून पोलो, व्हेंटो आणि ताइगुनच्या किमती 2 ते 5% ने वाढवल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनीही अद्याप मॉडेलनुसार दरवाढ जाहीर केलेली नाही. मात्र, नुकतीच लाँच करण्यात आलेली वोक्सवॅगन टायगन फेसलिफ्ट किंमत वाढीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आली आहे.

8.सिट्रोजेन
सिट्रोजेनचे भारतातील एकमेव मॉडेल - C5 Aircos ची एक्स-शोरूम किंमत 3% नी वाढलेली दिसेल. C5 एअरक्रॉसची किंमत वाढण्याची ही दोन महिन्यांत दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये असे घडले होते, यावेळी कारच्या किमतीत 1.30 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. C5 एअरक्रॉसची भारतातील किंमत 31.30 लाख ते रु. 32.80 लाख (एक्स-शोरूम) आहे.

9.मर्सिडीज बेंझ
मर्सिडीज-बेंझने निवडक मॉडेल्सवर 2% वाढीची घोषणा केली आहे, तरीही कंपनी काही मॉडेल्सवर किंमत संरक्षण देत आहे. मर्सिडीजने स्पष्ट केले आहे की ज्या ग्राहकांनी त्यांचे MY2021 मॉडेल बुक केले आहेत आणि त्यांच्या डिलिव्हरीची वाट पाहत आहेत त्यांना बुक केलेल्या किंमतीवरच गाडी मिळेल. याव्यतिरिक्त, जे ग्राहक 31 डिसेंबरपर्यंत ए-क्लास, GLA आणि ई-क्लास सारख्या निवडक श्रेणीतील कार बुक करतात, त्यांना किंमत संरक्षण देखील दिले जाईल.

10.ऑडी
ऑडी आपल्या पूर्ण मॉडल्स पोर्टफोलियोवर 3% ने किंमत वाढवली आहे. इतर सर्व कार कंपन्यांप्रमाणेच ऑडीनेही किमतीत वाढ होण्याचे श्रेय इनपुट खर्च वाढण्याला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...