आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tech auto
  • A Mobile App That Can Be Created Without Learning Coding, Amazon Introduces Honeycode Service

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेक्नॉलॉजी:कोडिंग शिकल्याविना तयार करता येणार माेबाइल अॅप, अॅमेझॉनने सादर केली अफलातून हनिकोड सेवा

सिएटल10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हनिकोडच्या मदतीने कुणीही अगदी तगडे मोबाइल अॅप आणि वेब पेज तयार करू शकेल

अॅमेझॉनचा क्लाऊडविषयक विभाग अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या (एडब्ल्यूएस) मदतीने आता विना प्रोग्रॅमिंग स्किल्स आणि कोडिंग न शिकताही मोबाइल अॅप तसेच वेब पेज तयार करता येईल. यासाठी कंपनीने अॅमेझॉन हनिकोड सर्व्हिस लाँच केली आहे. हनिकोड सर्व्हिस कोडिंगबद्दल ज्ञान नसतानाही साधारण व्हिज्युअल अॅप्लिकेशन बिल्डरच्या माध्यमातून अॅप तयार करण्याचे सुविधा देते.

अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट लॅरी ऑगस्टन म्हणाले, की आमचे ग्राहक या प्रकारच्या सेवेची अनेक दिवसांपासून मागणी करत होते. आता अॅमेझॉन हनिकोडच्या मदतीने कुणीही अगदी तगडे मोबाइल अॅप आणि वेब पेज तयार करू शकेल. कोणतेही कोड लिहिण्याची गरज नाही. सध्या कंपनीने ही सेवा ऑरेगॉन या पश्चिम अमेरिकेतील भागांत लाँच केली आहे.

२० युजरसाठी फ्री अॅप

या सेवेचा वापर करणारे ग्राहक काही मिनिटांत अॅप तयार करणे सुरू करू शकतात. २० युजरसाठी यात अॅप फ्री तयार करता येतील. मात्र, मोठ्या अॅप्लिकेशनना युजर आणि स्टोअरेजसाठी पैसे द्यावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...