आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे, एआयबाबत खूप दिवसांपासून काम होत आहे. चॅटजीपीटीसारख्या एआय चॅटबोटने नुकतेच या चर्चेला वेग आणला आहे. कुणी हे उपयोगी असल्याचा दावा करत आहे, तर कुणी एआय धोकादायक असल्याचे सांगत आहे. नुकतेच एआयचे जनक ज्योफ्रे हिंटनसह १००० तंत्रज्ञ लीडर, संशोधकांनी पत्र लिहून एआय समाज व मानवतेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.
अखेर एआयचा काय धोका आहे?
माणसांप्रमाणे हा बोलू शकतो. तो आश्चर्यकारक पद्धतीने लोकांना सहमत करण्यात कुशल आहे. नैसर्गिक भाषेत आपल्याशी संवाद करू शकतो. वैद्यकीय सल्ला, भावनात्मक मदत आणि माहितीसाठी लोक यावर विश्वास ठेवतील. मात्र, याद्वारे चुकीची माहिती पसरण्याची जोखीम आहे. प्रचारासाठी याचा दुरुपयोग होऊ शकतो. एरिजोना विद्यापीठातील संगणकशास्त्राचे प्रा. सुब्बाराव कंभामपती यांच्या म्हणण्यानुसार, ही प्रणाली अचूक होण्याची कोणतीही गॅरंटी नाही. शाळा-महाविद्यालयांत यावर बंदी घातली पाहिजे.
तरीही एआय का वाढत आहेॽ
एआयच वैद्यकीयसह विविधा क्षेत्रात वापर वाढत अाहे. कर्करोगासारख्या आजारांवरील उपचारात मदत मिळत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, याचा योग्य पद्धतीने उपयोग केल्यास हे माणुसकीचे भले करू शकते. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधील संशोधकांनी विना इम्प्लांटची एआय आधारित भाषा विकसित केली आहे. ही लोकांचे विचार त्यांच्या भाषेत रूपांतरित करते. हे बिना इम्प्लांटच्या बोलण्यात असमर्थ लोकांच्या भाषेला एफएमआरआय स्कॅनच्या मदतीने वाचू शकते. याच पद्धतीने अर्धांगवायूग्रस्त लोकांचा विचार मजकूरात रूपांतरीत करू शकतो. चॅट जीपीटी, बार्ड, बिंगसारखे मॉडेल खूप जास्त लिखाणावर प्रशिक्षित केले आहे. यामुळे ते वेगळ्या वाक्याचा अंदाज बांधण्यात समर्थ आहे.
एआयमुळे नोकरी जाण्याचा धोका आहे का?
एका संशोधनानुसार, अमेरिकेतील ८०% मनुष्यबळाच्या १०% कामावर यामुळे परिणाम होईल. सुमारे १९% कर्मचाऱ्यांच्या ५०% कामावर याचा परिणाम होऊ शकतो. आयबीएमचे सीईओ अरविंद कृष्णा म्हणाले, ग्राहकांशी थेट संपर्क नसलेले आमचे २६,००० कर्मचारी आहेत. यामध्ये ३०% एआय आणि ऑटोमेशनद्वारे कामे होऊ लागतील. मात्र, सॅमसंगने स्टाफच्या एआय टूल्स वापरावर बंदी घातली आहे. त्यांचे संवेदनशील कोड प्लॅटफॉर्मवर अपलोड झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलले आहे. मात्र, एआय समर्थक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एआयमुळे नव्या क्षेत्रांत राेजगाराच्या संधी निर्माण होतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.