आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • AIRTEL | PLAN | Airtel Raises Tariff Plan Prices, Rs 99 For A Prepaid Plan Of Rs 79; Geo Vodafone Will Also Become More Expensive

एअरटेल युजर्सला झटका:एअरटेलने टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या, 79 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी मोजावे लागणार 99 रुपये; जिओ-वोडाफोनदेखील महागणार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअरटेलने आपल्या प्रीपेड टॅरीफ प्लानमध्ये 25 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानूसार आता 26 नोव्हेंबरपासून नवीन प्लॅन लागू होतील. याआधी कंपनीने पोस्टपेड प्लॅनमध्ये देखील वाढ केली होती.

त्यानंतर कंपनीने 28 दिवसांसाठी असणाऱ्या 79 रुपयाच्या प्लॅनचे दर वाढवून 99 रुपये इतके केले आहे. तर 149 रुपयांच्या रिजार्चची किंमत वाढली असून ग्राहकांना आता 179 रुपये मोजावे लागणार आहेत. एअरटेलने आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्याने जियो आणि वोडाफोन देखील आपल्या प्लॅनमध्ये वाढ करू शकते.

एअरटेलने का वाढवल्या रिचार्जच्या किंमती
भारतीय एअरटेलने किंमती वाढवल्याचे कारण देत सांगितले आहे की, चांगल्या आणि निरोगी बिझनेस मॉडेलसाठी दर वाढवणे आवश्यक आहे. कंपनीने पुढे म्हटले आहे की, प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) 200 रुपये असावा आणि नंतर तो 300 रुपयांपर्यंत वाढवावा. जेणेकरून गुंतवलेल्या भांडवलावर कंपन्यांना योग्य परतावा मिळू शकेल.

जियो आणि वोडाफोनदेखील वाढवू शकतात प्लॅनच्या किंमती
एअरटेलने आपल्या टॅरीफ प्लॅनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 26 नोव्हेंबरपासून त्याच्या किंमती लागू होणार आहेत. एअरटेलने किंमती वाढवल्यानंतर जियो आणि वोडाफोनदेखील आपल्या प्लॅनच्या किंमती वाढू शकते. सध्या तरी या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे घोषणा केलेली नाही.

कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी
भारती एअरटेलच्या समभागांनी व्यवहारात 5% वाढीसह 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ज्याची किंमत 749.15 रुपये इतकी आहे. कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांच्या मोबाईल टॅरिफमध्ये वाढ केली असल्याने, त्याचा परिणाम या शेअरवर दिसून आला.

एअरटेलचे प्लान जिओपेक्षा 50% जास्त महाग होणार
एअरटेलने केलेल्या या वाढीनंतर प्रीपेड प्लॅन जिओच्या तुलनेत 30 ते 50 टक्के महाग झाले आहेत. 2GB आणि 28 दिवसांची वैधता असलेला जिओच्या प्लॅनची किंमत 129 रुपये आहे, तर एअरटेलच्या प्लॅनची किंमत 179 रुपये आहे. त्याचप्रमाणे, जिओचा 1.5GB 84 दिवसांचा वैधता प्लॅन 555 रुपये आहे, तर एअरटेलसाठी ग्राहकांना 719 रुपये मोजावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...