आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Tech auto
 • Amazon Cancels One Month Prime Subscription In India Due To RBI Mandate, Discontinues Free Trial As Well; News And Live Updates

ॲमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप रद्द:RBI च्या नवीन नियमांमुळे कंपनीने मासिक सब्सक्रिप्शन योजना केली बंद, फ्री ट्रायल साइन-अपदेखील होणार नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • ॲमेझॉन प्राइम फ्री ट्राइल वर नवीन सदस्यांना साइन-अप करता येणार नाही.

अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप घेणार्‍या वापरकर्त्यांसाठी एक वाईट बातमी आहे. वास्तविक, कंपनीने त्यांचे मासिक प्राइम मेंबरशिप सब्सक्रिप्शन रद्द केले आहे. त्यामुळे प्रत्येक मेंबरशिप घेणार्‍या लोकांना याची चिंता वाटत आहे. कारण कंपनीने आता केवळ 3 महिन्यांच्या किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या योजनांवर मेंबरशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या नवीन नियमांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, आरबीआयच्या नवीन नियमांमुळे आम्ही 27 एप्रिलपासून आमची मासिक प्राइम मेंबरशिप रद्द करत असून यामध्ये या खालील दोन्ही सेवाचा समावेश असणार आहे...

 1. ॲमेझॉन प्राइम फ्री ट्राइल वर नवीन सदस्यांना साइन-अप करता येणार नाही.
 2. मासिक प्राइम मेंबरशिपसाठी नवीन सदस्य साइन-अप करु शकणार नाही.

3 महिन्याचा किंवा वार्षिक प्लान घ्यावे लागणार
ॲमेझॉनच्या मासिक प्राइम सदस्यांचे मासिक सब्सक्रिप्शन 129 रुपये आहे. 3 महिन्यांसाठी 329 रुपये तर एका वर्षासाठी 999 रुपये मोजावे लागतात. त्यामुळे येथून पुढे युजर्संना आता मासिक 129 रुपयांचा पर्याय उपलब्ध राहणार नसून 329 किंवा 999 रुपयांचा मासिक प्राइम मेंबरशिप घ्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे जे युजर्स फ्री ट्रायल एक्सिस करत होते त्यांचे खाते सस्पेंड करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने दिली.

आरबीआयचा नवीन आदेश

 • आरबीआयने यासंबंधित नवीन नियम ऑगस्ट 2019 मध्ये जाहीर केले असून बँका आणि वित्तीय संस्थांसाठी यावर्षीच्या 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ही मुदत वाढविण्यात आली होती.
 • देशातील विविध उद्योग संस्थांच्या माध्यमातून व्यापार्‍यांनी आरबीआय आणि सरकारला विनंती केली होती. मोबाईल, युटिलिटी व इतर बिलांच्या ऑटो-पेमेंट आणि ओव्हर-द-टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मची सदस्यता शुल्कांत यामुळे अडथळा येत असल्याचे मानले जात होते.
 • बँक आपल्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर स्वयंचलित देयकासाठी नवीन विनत्यांना अशा परिस्थितीत प्रोसेस करु शकणार नाही. त्यामुळे वापरकर्त्यांना तीन महिने किंवा वार्षिक सदस्यतांसाठी ॲमेझॉन प्राइम घ्यावे लागेल.
 • आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 5 हजारापर्यंतच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त घटक प्रमाणीकरण आवश्यक असेल. सरकारने यापूर्वी त्याची अंतिम मुदत ऑगस्ट 2019 मध्ये ठेवली गेली होती, परंतु नंतर ती 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...