आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅपलचा नवीन माइलस्टोन:3 ट्रिलियन डॉलरसह बनली जगातील सर्वात मोठी मार्केट कॅप असणारी कंपनी; वॉलमार्ट, नेटफ्लिक्स सारख्या कंपन्यांना टाकले मागे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅपलचे मार्केट कॅप 3 ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेले आहे. हे मार्केट कॅप भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. सोमवारी, 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात, Apple च्या मार्केट कॅपने इतिहासात प्रथमच 3 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 3 लाख कोटी डॉलर (सुमारे 224 लाख कोटी) च्या पार गेले आहे. दुसरीकडे, जर आपण भारताच्या जीडीपीबद्दल बोललो, तर ते सुमारे 2.65 ट्रिलियन डॉलर आहे.

मार्केट कॅपिटलायजेशन 2.99 ट्रिलयनपर्यंत पोहोचले
वर्षाच्या व्यवसायाच्या पहिल्या दिवशी, सिलिकॉन व्हॅलीच्या या कंपनीचे शेअर 182.88 डॉलरच्या इंड्राडे रिकॉर्ड हाय लेव्हलवर पोहोचले आहे. ज्यामुळे अ‍ॅपलचा मार्केट व्हॅल्यू 3 ट्रिलियन डॉलरच्या थोडा वर झाला आहे. स्टॉकने 2.5% च्या वाढीसह 182.01 डॉलरवर व्यापार संपवला. ज्यामध्ये अ‍ॅपलचा मार्केट कॅपिटलायजेशन 2.99 ट्रिलियन डॉलर होता. जगातील सर्वात मौल्यवान कंपनीने एक मैलाचा दगड गाठला. जेथे गुंतवणूकदारांनी पैज लावली होती की ग्राहक iPhones, MacBooks आणि Apple TV आणि Apple Music सारख्या सेवांसाठी पैसे देणे सुरू ठेवतील.

ऑगस्ट 2018 मध्ये 1 ट्रिलियन डॉलरची बनली कंपनी
अ‍ॅपलचा बाजार मूल्याचा विक्रम जास्त उल्लेखनीय आहे की तो एवढ्या वेगाने वाढला आहे. ऑगस्ट 2018 मध्ये, Apple 1 ट्रिलियन डॉलर किंमत असलेली पहिली यूएस कंपनी बनली. या कामगिरीला 42 वर्षे लागली. दोन वर्षांनंतर ते 2 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त झाले. त्याच्या पुढील ट्रिलियनला फक्त 16 महिने आणि 15 दिवस लागले.

मायक्रोसॉफ्टही या शर्यतीत सामील आहे
टेक दिग्गज मायक्रोसॉफ्ट या वर्षीच्या 3 ट्रिलियन डॉलर क्लबमध्ये सामील होऊ शकते. Apple ने जानेवारी 2007 मध्ये आयफोन सादर केला तेव्हा कंपनीची किंमत 73.4 बिलियन डॉलर होती.

वॉलमार्ट, नेटफ्लिक्ससारख्या कंपन्यांना मागे टाकले
हा विक्रम साधल्यानंतर अ‍ॅपलचे बाजारमूल्य वॉलमार्ट, डिस्ने, नेटफ्लिक्स, नायके, एक्सॉन मोबिल, कोका-कोला, कॉमकास्ट, मॉर्गन स्टॅनले, मॅकडोनाल्ड, AT&T, गोल्डमन सॅक्स, बोईंग, IBM आणि फोर्ड यांच्यापेक्षा कितीतरी जास्त झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शेअर्सने उसळी घेतल्याने ऍपलला हा जादूचा आकडा गाठण्यासाठी थोडीशी वाढ आवश्यक होती, जी कंपनीने सोमवारी गाठली.

भारत-ब्रिटेनच्या जीडीपीपेक्षा जास्त व्हॅल्यू
अ‍ॅपलने हे यश मिळवत भारत आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. 3 ट्रिलियनची कंपनी बनल्यानंतर तिचे मूल्य भारत आणि ब्रिटनच्या नॉमिनल जीडीपीपेक्षा जास्त झाले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेच्या नॉमिनल GDP चा आकार 20.49 ट्रिलियन डॉलर आहे. या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर (13.4 ट्रिलियन डॉलर), जपान तिसऱ्या क्रमांकावर(4.97 ट्रिलियन डॉलर) आणि जर्मनी चौथ्या क्रमांकावर (4.00 ट्रिलियन डॉलर) आहे. ब्रिटन 2.83 ट्रिलियन डॉलरसह पाचव्या, फ्रान्स 2.78 ट्रिलियन डॉलरसह सहाव्या आणि भारत 2.65 ट्रिलियन डॉलरसह सातव्या स्थानावर आहे. अशाप्रकारे अॅपल या मार्केट कॅपद्वारे जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे.

आयफोनची विक्री 192 अब्ज डॉलरची
सप्टेंबरमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात, आयफोनची विक्री 192 बिलियन डॉलर इतकी राहिली होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 40% वाढली आहे. अ‍ॅपल ही अमेरिकेतील सर्वात मोठी टॅक्सपेयर कंपनी आहे. एप्रिलमध्ये कंपनीने म्हटले होते की, गेल्या पाच वर्षांत 45 बिलियन डॉलर कर भरला आहे.

बातम्या आणखी आहेत...