आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय रिझर्व्ह बँकेने फीचर फोन (साधा मोबाइल) युजर्ससाठीही यूपीआय पेमेंट प्रोडक्ट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, आता इंटरनेटविनाही यूपीआयच्या माध्यमातून व्यवहार करता येणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी आर्थित पतधोरण आढाव्यानंतर याबाबत माहिती दिली. तथापि, या सुविधेच्या प्रारंभाबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, पतधोरण आढाव्यात रेपोदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनुसार, भारतात आजमितीस सध्या सुमारे ११८ कोटी मोबाइल फोन वापरले जातात. यापैकी ७८ कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. यामुळे देशात आजही मोठ्या प्रमाणात फीचर फोनचा वापर होत असल्याचे यातून दिसते.
दुसरीकडे, रिझर्व्ह बँकेने यूपीआयद्वारे आयपीओ आणि रिटेल डायरेक्ट स्कीमच्या माध्यमातून सरकारी बाँडमध्ये गुंतवणुकीची मर्यादाही सध्याच्या दोन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.