आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • BSNL Summer Offer | BSNL Brings Great Offer! Under This Plan, You Will Get 120GB Of Data For Free; Get Information About The Offer And Recharge Immediately | Marathi News

बीएसएनएलची उन्हाळी ऑफर:BSNL ने आणली धमाकेदार ऑफर! 'या' प्लॅनअंतर्गत 120GB डेटा मोफत मिळणार; ऑफरची माहिती घेऊन लगेच रिचार्ज करुन घ्या...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी उन्हाळी ऑफर जारी केले आहेत. हा एक लिमिटेड कालावधीचा ऑफर असणार आहे. 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसाठी उन्हाळी ऑफर कंपनीने जारी केले आहे. BSNL 2399 रुपयांच्या प्लॅनसह अनेक दिवसांपासून अतिरिक्त वैधता ऑफर देत आहे. यामध्ये ग्राहकाला अनेक फायदे मिळत आहेत. जे ग्राहक वर्षभरासाठी एकदाच रिचार्ज करतात त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम ऑफर आहे. या ऑफरमध्ये काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात...

बीएसएनएलच्या 2399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर उन्हाळी ऑफर

BSNL आपल्या उन्हाळी ऑफर अंतर्गत 2399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन जारी करत आहे. या प्लॅनसह, ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100 SMS प्रतिदिवस मिळतात. याशिवाय ग्राहकांना Telco कडून कॉलर ट्यून सेवा आणि Eros Now चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. साधारणपणे हा प्लॅन 365 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो. पण उन्हाळी ऑफर अंतर्गत, ग्राहकांना 60 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळेल. याचा अर्थ असा आहे की, या प्लॅनसह वापरकर्त्यांना टेलिकॉमकडून एकूण 425 दिवसांची सेवा मिळेल.

हायस्पीड डेटा वापरणाऱ्यांसाठी हे ऑफर योग्य नाही

जे ग्राहक हायस्पीडने डेटा वापर करतात, त्यांच्यासाठी हे ऑफर योग्य नाही. कारण, बीएसएनएलकडे 4G नेटवर्क नाही, याच अर्थ असा की, जर कंपनीने तुम्हाला 2GB डेटा दिला, पण इंटरनेटची स्पीड नसल्याने कंपनीने दिलेला डेटा तुमच्या काहीच कामाचा नाही. कारण इंटरनेटची स्पीड कमी असते. मात्र, हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी फायदेशीर आहे, ते 3G स्पीडने इंटरनेटवर काम चालवतात.

BSNL ची 4G सेवा लवकरच येणार आहे

BSNL कडून अधिक दीर्घकालीन योजना ऑफर केल्या जात आहेत. BSNL प्रत्येक नियमित अंतराने आपल्या ग्राहकांसाठी अशा अतिरिक्त वैधता ऑफर आणते. सरकारी टेल्को सध्या भारतात 4G नेटवर्क आणण्यावर काम करत आहे. 4G नेटवर्कच्या समर्थनामुळे या योजना अधिक मौल्यवान बनतील.

बातम्या आणखी आहेत...