आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिव्हाइस केअर:एका वेळी बॅटरी 80 टक्केच चार्ज करा

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट्सना चार्ज करण्याची चुकीची पद्धत तुमचे गॅजेट्स खराब करू शकते. उदाहरणार्थ, बहुंताश लोक आपले उपकरण चार्जरला लावून सोडून देतात. यामुळे गॅजेट डिस्चार्ज होणार नाही, असे त्यांना वाटते. मात्र तज्ञांच्या मते, वारंवार असे केल्यास ते तुमच्या उपकरणासाठी हानीकारक ठरू शकते. योग्य पद्धतीने चार्ज केल्यास बॅटरीचे आयुष्य वाढू शकते. याद्वारे तुम्ही बॅटरी चार्ज करण्याची योग्य पद्धत समजून घेऊ शकता.

{बॅटरी २० टक्क्यांवर आल्याशिवाय चार्जिंग सुरू करू नका. ८० टक्के झाल्यानंतर चार्जिंग बंद करा. वापराच्या आधीच उपकरण चार्जिंग केलेले योग्य राहील, खूप आधी चार्ज करू नका. जितके कमी चार्ज कराल, तितके बॅटरीचे कमी नुकसान होईल.

{बॅटरीला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी कधी कधी पूर्ण डिस्चार्ज करणे आणि रिचार्ज करावे लागते, असा एक समज आहे. हा नियम लीड अॅसिड बॅटरीला लागू होतो. हल्ली मोबाइल गॅजेट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम-आयन बॅटरीला हा नियम लागू होत नाही.

उपकरण २४ तास चार्ज करू नका. तथापि, पूर्णपणे डिस्चार्ज ठेवणेही योग्य नाही.

बातम्या आणखी आहेत...