आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • China India | Chinese Smartphone Companies; Agency Probe Against Xiaomi, Oppo And Vivo In India | Marathi News Vivo 

चीनी कंपन्यांची करचुकवेगिरी:शाओमी-विवो या चिनी कंपन्यानी भारतीय बाजारातून केली 1 लाख कोटींची कमाई; मात्र भरला नाही एकही रुपया टॅक्स

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा दबदबा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. शाओमी, ओप्पो, विवो यासारख्या चीनी कंपन्या आता भारतीयांच्या लोकप्रिय झाल्या आहेत. कारण या कंपन्या कमी किंमतीत जास्तीची सुविधा देतात. त्यामुळे भारतातील नागरिक या चीनी स्मार्टफोनला घेण्यास टाळाटाळ करत नाही. मात्र यामुळे चीनी कंपन्या भारताकडून मोठ्या प्रमाणात कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र याच चीनी स्मार्टफोन कंपन्यांचे आपल्या देशाच्या विकासात त्यांचे योगदान एक रुपयेही नसल्याचे समोर आले आहे.

चीनी कंपन्या दरवर्षी भारताकडून सुमारे 1 लाख कोटी रुपये स्मार्टफोनच्या माध्यमातून कमवते. मात्र याच चिनी कंपन्या या 1 लाख कोटी रुपयांमधून एक रुपयादेखील टॅक्स देत नाहीत. जेव्हा टॅक्सचा मुद्दा उपस्थित केला जातो तेव्हा या कंपन्या टॅक्स देण्यास स्पष्टपणे नकार देतात. मात्र आता भारत सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून, वेग-वेगळ्या तपास यंत्रणा चीनचा भांडाफोड करणार आहे.

उत्पन्न लपवण्याचे आरोप
वर दिलेल्या सर्व चीनी कंपन्यांवर आरोप लावण्यात आले आहे की, त्यांनी त्यांच्या उत्पन्नाची माहिती लपवली आहे. भारतीय करापासून सुटका मिळण्यासाठी या कंपन्यांनी आपला नफा देखील दाखवलेला नाही. सोबतच या चीनी कंपन्यामुळे स्वदेशी वस्तू हद्दपार होत आहे. या तीन कंपन्यांवर गेल्या काही वर्षांत नियामक फाइलिंगमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्यांच्या व्यवसाय पद्धतीचीही चौकशी होणार आहे.

कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया करणार तपास
काही दिवसांपुर्वीच भारताच्या वेग-वेगळ्या तपास यंत्रणेने चीनी मोबाईल कंपन्याच्या कार्यालयावर छापेमारी केली होती. त्या छापेमारीत भारतीय आयकर विभाग आणि डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस यांचा समावेश होता. त्यामुळेच सरकारने या कंपन्यांविरुद्ध व्यापक तपास सुरू केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपन्यांवर त्यांच्या पदाचा गैरफायदा घेण्याचा आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धतींचा अवलंब केल्याचा आरोप आहे. यामुळे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) देखील या तपासात सहभागी होऊ शकतो.

आर्थिक अहवालात अनेक त्रुटी समोर आल्या
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, गेल्या वर्षांत चिनी कंपन्यांनी केलेल्या आर्थिक अहवालाच्या प्राथमिक मुल्यांकनात त्रुटी दिसून आल्या आहेत. यामध्ये करचोरी, कमाई लपवणे आणि तथ्यांशी छेडछाड करणे ही बाब समोर आली आहे. सरकार सर्व संभाव्य मुद्द्यांचा तपास करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयही यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

चिनी कंपन्या मोठ्या विक्रीनंतरही तोटा दाखवतात
Xiaomi, Oppo आणि Vivo ने रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे फाइलिंगमध्ये नुकसान दाखवले आहे. मात्र त्यांच्या स्मार्टफोनची प्रचंड विक्री झाली आहे. सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत या तिन्ही कंपन्या अव्वल क्रमांकावर आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या भारतीय युनिट्सना प्रश्न पाठवले असता त्यांनी उत्तर दिले नाही. ओप्पो आणि विवोची मालकी चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी बीबीकेकडे आहे.

चिनी कंपन्यांनी त्यांची नेटवर्थ नकारात्मक दर्शविली
या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 2019-20 मध्ये भारतातील या सर्व कंपन्यांची एकूण उलाढाल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. मात्र, या कंपन्यांनी भारतात एक रुपयाही कर भरलेला नाही. Vivo आणि Oppo 2016-17 पासून त्यांची एकूण संपत्ती नकारात्मक दर्शवत आहेत. देशाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आघाडीवर असल्याचा दावा करणाऱ्या Xiaomi कंपनीला भारतात प्रचंड तोटा होत आहे. त्यात 2018-19 मध्ये 2447 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 3277 कोटी रुपयांचा तोटा झाला असे कर चुकवण्यासाठी दाखवण्यात येत आहे.

स्मार्टफोन मार्केटमध्ये भारतीय कंपन्यांचा हिस्सा 10% पेक्षाही कमी

देशातील चिनी कंपन्यांच्या वर्चस्वामुळे भारतीय कंपन्यांचा पाया कमकुवत झाला आहे. लावा, कार्बन, मायक्रोमॅक्स आणि इंटेक्ससारख्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये त्यांचा वाटा 10% पेक्षा कमी आहे. वितरणासाठी स्थानिक कंपन्यांशी हातमिळवणी करत नसल्याचा आरोपही चिनी कंपन्यांवर आहे. त्यांच्या बहुतेक पुरवठादार चीनी कंपन्या आहेत. तसेच, पार्ट्सच्या सोर्सिंगमध्ये पारदर्शकता नाही.

बातम्या आणखी आहेत...