आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटो एक्सपोमध्ये दिसेल मारुतीची पहिली EV:'टाटा पंच' EV वरूनही पडदा हटण्याची शक्यता; या कारवर राहिल विशेष नजर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो एक्स्पो-2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. 13 जानेवारीपासून दिल्लीत या एक्स्पोची सुरूवात होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पो मार्ट येथे हे प्रदर्शन लागणार आहे. मारुती सुझुकीची जिमनी या प्रदर्शनात सादर केली जाऊ शकते. याशिवाय मारुती सुझुकी या ठिकाणी प्रथमच इलेक्ट्रिक कारचेही अनावरण करणार आहे.

तर टाटाचे पंच इलेक्ट्रिक ऑटो एक्सपोमध्ये देखील पाहीले जाऊ शकते. आज आपण तुम्हाला ऑटो एक्सपोमध्ये सादर केल्या जाणाऱ्या संभाव्य SUV वाहनांबद्दल सांगत आहोत, त्यांची अपेक्षित किंमत आणि वैशिष्ट्याबद्ल सांगणार आहोत.

मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण देखील करू शकते. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे अनावरण देखील करू शकते. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

ऑटो एक्स्पोत 13 ते 18 या कालावधीत लोकांना प्रवेश
ऑटो एक्सपो मोटर शो इंडिया एक्सपो मार्ट, ग्रेटर नोएडा येथे आय़ोजित करण्यात आला आहे. जरी ऑटो एक्स्पो-2023 इव्हेंट 11 जानेवारीपासून सुरू होईल, परंतू 11 आणि 12 जानेवारी मीडियासाठी राखीव आहेत. 13 ते 18 जानेवारी या कालावधीत सर्वसामान्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. त्याची वेळ सकाळी 11 ते रात्री 8 अशी राहील.

यासाठी तिकीट द्यावे लागेल
तुम्हाला या कार्यक्रमाला हजेरी लावायची असेल तर त्यासाठी तिकीट काढावे लागेल. तिकीट दर दिवसागणिक बदलतात. 13 जानेवारीला त्याची किंमत 750 रुपये ठेवण्यात आली. एका तिकिटावर फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश मिळतो. 5 वर्षांखालील मुलांसाठी तिकीट नाही. 'बुक माय शो' ला भेट देऊन या कार्यक्रमाची तिकीटे खरेदी करता येतील.

यासंबंधित ही बातमी वाचा

ऑटो एक्स्पोत 30 हून अधिक ईव्ही कंपन्या : हीरो-होंडा-बजाजसारखे मोठे ब्रँड नाही, त्या 15 गाड्यावर खास नजर

दिल्लीत 13 जानेवारीपासून ऑटो एक्स्पो 2023 सुरू होत आहे. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पो मार्ट आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक बोलबाला असेल. यामध्ये 30 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश असेल. - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...