आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अत्याधुनिक वाहने, विशेषकरून इलेक्ट्रिक वाहने, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये वाहन उद्याेगात चांदीच्या मागणीत वेगाने वाढ हाेणार आहे. याचा सरळ म्हणजे मालमत्ता वर्ग म्हणून चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास सर्वाेेत्तम परतावा मिळू शकतो. अंदाजानुसार, २०२५ पर्यंत वाहन उद्योगातील चांदीची वार्षिक मागणी ९० दशलक्ष औंस म्हणजे २,५५१ टनांपर्यंत जणार आहे. यंदाच्या वर्षात वाहनांमधील चांदीची मागणी ६१ दशलक्ष आैंस (१,७२९.३५ टन) राहण्याची शक्यता आहे.फाेटाे व्हाॅल्टिक उद्याेगातील चांदीचा एकूण वापर ९२.७७८ टन राहण्याचा अंदाज आहे.
यावर्षी आणखी वाढेल साेन्याची चमक
मुंबई| रुळावर येणारी अर्थव्यवस्थेची गाडी,लोकांच्या उत्पन्नात हाेत असलेली वाढ यामुळे साेन्याचा वापरही वाढणार आहे. गेल्या वर्षी साेन्याचा वापर २६ वर्षांपेक्षाही कमी झालेला. पण आता मात्र ही स्थिती मागील वर्षाच्या तुलनेत नेमकी उलटी असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.