आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी डेटा चोरी:जगभरातील 53 कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा लीक, यात 60 लाख भारतीयांचा समावेश; झुकरबर्गचा नंबरही चोरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाव, पत्ता, ईमेल यासारखी माहिती लीक

पुन्हा एकदा फेसबुक डेटा लीक झाल्याचे समोर आले आहे. मोठी गोष्ट म्हणजे यावेळी हॅकर्सनी फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचा फोन नंबर आणि वैयक्तिक डेटाही सार्वजनिक केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील 100 हून अधिक देशांमधील 53 कोटींहून अधिक फेसबुक यूजर्सचा डेटा ऑनलाइन लिक झाला आहे. यापैकी हॅकर्सनी 500 कोटींहून अधिक लोकांचे फोन नंबर आणि खासगी डेटा सार्वजनिक केला आहे.

नाव, पत्ता, ईमेल यासारखी माहिती लीक झाली
हे फेसबुकच्या इतिहासातील सर्वात मोठे लीक प्रकरण असल्याचे मानले जाते. हॅकर्सनी 106 देशांमधील यूजर्जचा डेटा सार्वजनिक केला आहे. यात 60 लाख भारतीय यूजर्सचा डेटा हॅक झाल्याची माहिती मिळाली आहे. लीक झालेल्या डेटामध्ये यूजर्सचा फेसबुक आयडी, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि ई-मेल अ‍ॅड्रेसचा समावेश आहे. हा सर्व डेटा ऑनलाइन विनामूल्य देण्यात येत आहे.

तांत्रिक कमकुवतपणा ठरला डेटा लीक होण्याचे कारण
आयटी कायदे तज्ज्ञ सलमान वारस यांच्यानुसार, लीक झालेल्या वैयक्तिक माहितीमध्ये फेसबुक यूजर्सची जन्मतारीख, पूर्ण नाव, बायो, स्थान आणि ई-मेल अ‍ॅड्रेस समाविष्ट आहेत. अनेक प्रकरणांमध्ये फोन नंबरदेखील लीक झाले आहेत. 2019 मध्ये फेसबुकच्या तांत्रिक कमकुवततेमुळे ही माहिती लीक झाल्याचे समजते. या प्रकरणात, डेटा दीड ते दोन वर्ष जुना असू शकतो.

फेसबुकने डेटा जुना असल्याचे सांगितले
यासंदर्भात स्पष्टीकरण देताना फेसबुकने म्हटले आहे की लीक झालेला सर्व डेटा 2019 च्या आधीचा आहे. हे 2019 मध्ये लीक झाले होते. पुढील धोका टाळण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये त्रुटी सुधारण्यात आल्या होत्या.

यापूर्वीही भारतीयांचा डेटा लीक झाला आहे
यापूर्वीही फेसबुक डेटा लीक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. ब्रिटिश कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकावर 5.62 लाख भारतीयांचा फेसबुक डेटा चोरी करण्याचा आरोप होता. केंब्रिज अ‍ॅनालिटिका राजकीय सल्लागार म्हणून काम करते. सीबीआयनेही यासंदर्भात केंब्रिज अ‍ॅनालिटिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...