आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Facebook Policy Violation Update New Rules On Attacking Journalists Politicians And Celebrities On Its Platforms

फेसबुकने पॉलिसी केली अपडेट:पत्रकार, नेते आणि सेलिब्रिटींची खिल्ली उडवणे महागात पडणार, सेक्शुअल कंटेंट पोस्ट केल्यास अकाउंट बॅन होणार

सैन फ्रांसिस्को2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थेट संदेश पाठवण्याच्या नियमांमध्ये बदल होईल

फेसबुक आता सेक्शुअल कंटेंट पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. कंपनीने आपली पॉलिसी अपडेट केली आहे. या अंतर्गत जर एखाद्या वापरकर्त्याने सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा पब्लिक फिगर व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यामध्ये, वापरकर्त्याचे प्रोफाइल, पेज, ग्रुप किंवा इव्हेंट कायमचा काढून टाकला जाईल.

सोशल मीडियावर अनेक वापरकर्ते बॉलिवूड स्टार्स, क्रिकेटपटू आणि राजकारणी यांचे मीम्स बनवतात आणि शेअर करतात. आता असे विनोद करणे लोकांना महागात पडू शकते.

फेसबुकचे ग्लोबल सेफ्टी हेड अँटीगोन डेव्हिस यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे यूजर्स लोकांची प्रतिमा खराब करतात आणि ऑनलाईन त्रास देतात त्यांना कठोरपणे हाताळले जाईल. कंपनीने धोरण बदलून सार्वजनिक व्यक्ती आणि इंडिविजुअल यांच्यातील फरक हायलाइट केला आहे, जेणेकरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य अंमलबजावणी करता येईल.

थेट संदेश पाठवण्याच्या नियमांमध्ये बदल होईल
फेसबुक सामूहिकरित्या लोकांना लक्ष्य करणाऱ्या पोस्ट काढून टाकेल. यासह, इनबॉक्समध्ये थेट संदेश पाठवण्याचे नियम देखील बदलले जातील. कंपनी प्रोफाइल आणि पोस्टवर कमेंटला सिक्योर करेल. फेसबुकने म्हटले आहे की, सेलिब्रिटी आणि नामांकित लोकांची लिस्ट बनवली जाईल, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन छळापासून वाचवले जाऊ शकेल.

चुकीच्या पोस्ट थांबवणाऱ्या टीमला साइडलाइन करुन फेसबुक वादात सापडले
फेसबुकचे पॉलिसी अपडेट त्याचे माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांच्या खुलाशानंतर आले आहे. टाइम मासिकाने हॉगेन यांचे खुलासेही प्रकाशित केले होते. असे सांगण्यात आले की फेसबुकने सोशल मीडियावरील चुकीच्या माहिती आणि द्वेषयुक्त पोस्टविरोधात लढणाऱ्या टीमच्या सर्व सदस्यांना वेगळे केले आहे. फेसबुकने डिसेंबर 2020 मध्ये ही टीम काढून टाकली. हॉगेनने असेही म्हटले की कंपनीने आपले अंतर्गत सर्वेक्षण देखील लपवले, ज्यावरून हे दिसून आले की इंस्टाग्राम अल्गोरिदम तरुणांच्या मनावर कसा नकारात्मक परिणाम करत आहे.

फेसबुकने 1,259 अकाउंट, पेज आणि ग्रुप बॅन केले आहेत. जे सार्वजनिक डिबेटमध्ये प्लान करुन हेरफेर करतात. फेसबुकने इराणमधील 93 खाती, 14 पेज, 15 गट आणि 194 इंस्टाग्राम अकाउंट काढून टाकले आहेत. हे प्रामुख्याने घरगुती वापरकर्त्यांना लक्ष्य करत होते. याच महिन्यात फेसबुकने सुदान आणि इराणमध्येही कारवाई केली आहे. फेसबुकने सूडानमध्ये 116 पेज, 666 अकाउंट, 69 ग्रुप आणि 92 इन्स्टाग्राम अकाउंट काढून टाकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...