आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएआय टूल चॅटजीपीटीचा देशातील ४ मोठ्या परीक्षांत गोंधळ उडाला. भास्करने सोडवून घेतलेल्या या परीक्षांच्या ताज्या पेपरचे निकाल धक्कादायक आले. जेईई अॅडव्हान्स्डमध्ये-१ गुण मिळाला. नीट यूजी, क्लॅट यूजीत ५०%, सीयूईटी यूजीच्या बिझनेस स्टडीजमध्ये ६६.४% मिळाले. आयआयटी दिल्लीचे माजी संचालक प्रो. राम गोपाल राव म्हणाले, की जेईई अॅडव्हान्स्ड क्वाँंटिटेटिव्ह टेस्ट आहे. चॅटजीपीटी लँग्वेज मॉडेल आहे. सैद्धांतिक प्रश्नांचा अचूकपणा चांगला आहे. तो हळूहळू वाढेल.
चूक कुठे झाली ?: कॉन्सेप्ट समजून घेण्यात एआय टूल अपयशी; भौतिक, रसायन, गणिताची उत्तरे चुकीची
४ परीक्षांचे पेपर सोडवताना रिजनिंग व कॉन्सेप्टच्या प्रश्नांमध्ये चॅटजीपीटीला चांगला स्कोअर करता आला नाही. पीसीएमच्या प्रश्नांत फॉर्म्युले, काॅन्सेप्ट व डायग्राम असतात. अशात त्याच्याशी निगडित प्रश्न त्याचे निराकरण करू शकले नाहीत. या टूलच्या नॉलेजची कट ऑफ डेट सप्टेंबर २०२१ पर्यंतचीच आहे.
जेईई अॅडव्हान्स्ड 1 मार्क्स
१११ पैकी फक्त २६ प्रश्नांचीच योग्य उत्तरे
नीट 45 %
२०० प्रश्नांपैकी फक्त १०९ उत्तरेच योग्य होती
क्वालिफाय, मात्र स्कोअर ४५%: नीटमध्ये २०० पैकी १८० प्रश्न सोडवावे लागतात. भास्करने पूर्ण २०० प्रश्नांचे निराकरण केले. ८०० पैकी ३५९ गुण मिळाले. गेल्या वर्षीच कट ऑफ मिळवले होते, मात्र गुण ४५% मिळाले. बायोलॉजीच्या प्रश्नांची अधिक बरोबर उत्तरे दिली.
क्लॅट मार्क्स 51%
८९ प्रश्नांमधील ४९ उत्तरेच बरोबर होती
इंग्रजी-करंट अफेयर्समध्ये उत्तम : क्लॅट यूजीत या टूलने ५०.८३% पेपर अचूक सोडवला. इंग्रजी आणि करंट अफेयर्समध्ये सर्वाधिक स्कोअर केला. तर लिगल रिजनिंग आणि क्वान्टिटेव्ह टेक्निक्समध्ये मात्र गोंधळ झाला. येथेही टूल, कॉन्सेप्ट समजू शकले नाही.
सीयूइटी यूजी मार्क्स 66 %
५० प्रश्नांपैकी ३६ चीच उत्तरे बरोबर आली
थिअरीत यशस्वी : सीयूइटी यूजी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी इन्ट्रन्स टेस्टमध्ये हा टूल यशस्वी ठरला. बिझनेस स्टडीजच्या पेपरमधील ५० पैकी ३६ प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. ५० पैकी ४५ प्रश्नच सोडवायचे होते. चॅटजीपीटीने प्रत्येक प्रश्नाची सविस्तर उत्तरे दिली.
लीगल रिजनिंग कमकुवत, उत्तरेही सतत बदलत गेली
{क्लॅटच्या लीगल रिजनिंग
भागात दिलेल्या उताऱ्यात सरोगेसी रेग्युलेशन अॅक्ट-२०२१ बाबत ५
पैकी २ उत्तरे बरोबर.
{ लीगल सर्व्हिसेस अॅथॉरिटी अॅक्ट-१९८७ बाबत ५ पैकी ४ उत्तरे चुकीची.
{विश्वासार्हता तपासण्यासाठी भास्करने त्याला एकच प्रश्न दोनदा विचारल्यानंतर काही प्रश्नांची उत्तरे बदलली. एआयने आधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशाचे माजी राज्यपाल म्हटले. नंतर योग्य उत्तर देत झारखंड सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.