आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Festive Season Sales Offer 2021 Update; Navratri Dhanteras Dussehra To Diwali | Smartphone TVs AC Fridge Expensive; News And Live Updates

सणासुदीच्या काळात महागाईचा फटका:स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणे होतील महाग; जाणून घ्या तुमच्या खिशावर काय होईल परिणाम?

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कच्चा मालाच्या किंमतीत सतत वाढ

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव हळूहळू कमी होत आहे. तर दुसरीकडे, सणासुदीच्या काळात बाजारात गर्दी आहे. दुकाने उघडली असून पुर्वीप्रमाणेच वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. नवरात्री, दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीपर्यंत खरेदीचा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु, वाढत्या महागाईमुळे यावर ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार आणि दुचाकीनंतर आता स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, फ्रिज, एअर कंडिशनर यासारख्या लोकांच्या गरजांशी संबंधित वस्तूंच्या किंमतीही वाढणार आहेत. त्यामुळे तुम्ही सणासुदीच्या काळात या वस्तू खरेदी करणार असाल खिसाला आणखी कात्री लागू शकते.

कच्चा मालाच्या किंमतीत सतत वाढ
देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई प्रचंड वाढली आहे. विशेष म्हणजे या वस्तुसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आणि वाहतुक किंमतीत ही सतत वाढ होत आहे. यामुळे देशातील या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. निर्मात्यांच्या मते, खर्चाच्या बाबतीत हा आतापर्यंतचा सर्वात वाईट काळ आहे. काही चार आणि दुचाकी कंपन्यांनी आधीच किंमती वाढवल्या आहेत. सणासुदीच्या काळात या वस्तूंच्या किंमती वाढण्याची कारणे, तसेच त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल, हे सविस्तर समजून घेऊया.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 8% पर्यंत होतील महाग
येत्या काही दिवसांत किंवा नवरात्रीच्या आसपास ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू 8 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात. तर दुसरीकडे, कार आणि दुचाकींच्या किंमतीत ही 1-2 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या 12 ते 18 महिन्यांत कार आणि दुचाकींच्या किमतीत 10-15% वाढ झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमतीचा तुमच्यावर कसा परिणाम होईल? ते एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया ....

समजा आपण नवीन 4K टीव्ही आणि फ्रीज खरेदी करण्याचा विचार करत आहात. एखाद्या चांगल्या कंपनीच्या टीव्हीची सध्याची किंमत 25 हजार रुपये आणि रेफ्रिजरेटरची किंमत 20 हजार रुपये आहे. म्हणजेच तुम्ही या दोन्ही वस्तू 45,000 रुपयांना खरेदी करू शकता. परंतु, यामध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाल्यास तुम्हाला 3 हजार 600 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.

आयात होत आहे महाग
वाहनांच्या आयातीचे दरही गेल्या काही महिन्यांपासून झपाट्याने वाढत आहेत. यामुळे 5 ते 25 लाख रुपयांपर्यंतच्या कारचे मॉडेल 50,000 ते 2.5 लाख रुपये महाग झाले आहेत. महागड्या आयातीचा परिणाम दुचाकींवरही झाला आहे. दरम्यान, या काळात बाईक आणि स्कूटरच्या किंमती 5,000 रुपयांवरून 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. आयात महाग झाल्यामुळे देशातील वस्तुंच्या किंमतीत ही वाढ होत आहे.

कारच्या किंमतीत 5 वेळा बदल
महागाईमुळे किंमती वाढल्याने दुचाकी बाजारावर याचा वाईट परिणाम झाला आहे. परंतु, कारच्या मागणीवर त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. गेल्या 2-3 महिन्यांत कार विक्रीचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. कन्सल्टन्सी जाटो डायनॅमिक्स इंडियाचे अध्यक्ष रवी भाटिया यांच्या मते, या वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या 10 मॉडेलच्या किंमतीत 5 वेळा बदल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, वेटेड अॅव्हरेज इंसेंटिव प्रति कार 13,000 रुपयांवरून 8,000 रुपयांवर आले असल्याचे भाटिया म्हणाले.

परदेशी कंपनीचा माल 8% महागला
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (IDC) एका अहवालानुसार, सर्व कंपन्यांनी उत्पादन पुन्हा सुरू केल्यामुळे स्मार्टफोनच्या किंमती 3-5% वाढल्या आहेत. या कंपन्या आता नवीन मॉडेल तयार करत आहेत. बॉश, सीमेन्स आणि हिताची सारख्या उपकरणांचे ब्रँड त्यांच्या उत्पादनांच्या किंमती 3-8% पर्यंत वाढवत आहेत. तर दुसरीकडे, पुढील महिन्यापासून इतर कंपन्याही असे करण्याचा विचार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...