आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईएस 2023:पहिला वायरलेस ओएलईडी टीव्ही, 13 व्या पिढीचा सीपीयू

लास वेगासएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (सीईएस) २०२३ फिजिकल फॉर्मेटमध्ये पुनरागमन करत आहे. ५ ते ८ जानेवारीदरम्यान याचे आयोजन लास वेगासमध्ये कन्व्हेशन सेंटरमध्ये होणार आहे. जगातील टेक शोमध्ये सुमारे २४०० कंपन्या सहभागी होत आहेत. या वर्षी सीईएसमध्ये काय दिसणार आहे ते जाणून घेऊया...

{पहिला वायरलेस ओएलईडी टीव्ही |सीईएसमध्ये जगातील पहिला वायरलेस ओएलईडी टीव्ही सादर केला जाऊ शकतो. अमेरिकी कंपनी डिस्लेसने तो तयार केला आहे. हा टीव्ही २०२३च्या अखेरला बाजारात उपलब्ध असेल. तो टच आणि व्हॉय कमांडने चालेल. तो हाताच्या इशाऱ्याने कंट्रोल केला जाऊ शकेल. मोठी स्क्रीन बनवण्यासाठी दोन टीव्हीशी जोडले जाऊ शकते.

{नवे स्मार्ट होम प्राॅडक्ट्स सॅमसंग अनेक स्मार्ट कनेक्टेड प्रॉडक्ट्स सादर करू शकते. कंपनी वर्क-फ्रॉम-होमश्सी बंधित प्रॉडक्ट्स- नवे लॅपटॉप, स्मार्ट रेफ्रिजरेटर आणि इतर घरगुती उपकरणे सादर करू श्काते.।

{हाय-अँड गेमिंग मॉनिटर एलजी लेटेस्ट फ्लॅगशिप गेमिंग मॉनिटर- एलजी अल्ट्रागियर ओएलईडी सादर करेल.यात २४० हर्ट्ज रिफ्रेश रेट सारखी सुविधा असेल. कंपनी ओएलईडी व वेब ओएस टेक्नोलॉजीसह नवे स्मार्ट टीव्ही, साउंडबार आणि स्पीकर्स शिवाय स्मार्टफोन कॅमरा सादर करेल.

{नवे स्मार्ट टीव्ही, प्लेस्टेशन व्हीआर-२ सोनी सीईएस येथे बहुप्रतिक्षित प्लेस्टेशन व्हीआर-२ लाँच करेल. याशिवाय, कंपनी काही नवीन स्मार्ट टीव्ही, होम थिएटर सिस्टम आणि नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करू शकते.

{भविष्य चालविण्यावर भर मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, फोक्सवॅगन, ह्युंदाई आणि इतर कंपन्या भविष्यातील इलेक्ट्रिक वाहने आणि स्वयंचलित वाहनांची झलक दाखवू शकतात.

{नवीन गेमिंग लॅपटॉप डेल नवीन गेमिंग लॅपटॉप संगणक लॉन्च करू शकते. यामध्ये पुढील पिढीतील अॅलाइनवेअरएक्स मालिका आणि अलाइनवेअर एम मालिका लॅपटॉपचा समावेश आहे.

{व्हीआर-एआर गॅजेट व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) हे शोचे मुख्य आकर्षण असेल. मेटाचे क्वेस्ट प्रो आणि सोनीचे पीएसवीआर-२ वर नजर असेल. अॅपल देखील व्हीआर किंवा एआर-संबंधित प्रॉडक्ट्स सादर करेल.

बातम्या आणखी आहेत...