आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलचे नवे फिचर:एकाच सिम कार्डवर दोन ऑपरेटरची सेवा घेता येणार, अँड्रॉईड 13 मध्ये रोल आउट होऊ शकते फिचर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगल हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. आपल्या युजर्ससाठी गुगल सतत स्व:ताला अपडेट करत असतं. आता गुगलने लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 13 चे प्रिव्ह्यू व्हर्जन जारी करणे सुरू केले आहे. नवीन ओएस युजर्संना अनेक नवे फिचर मिळणार आहेत. एस्परच्या रिपोर्टनुसार, यामध्ये तुम्ही एकाच सिम कार्डवर दोन ऑपरेटरची सेवा घेऊ शकाल. युजर्ससाठी हे गेम चेंजर फीचर असेल. याचा मोठा फायदा म्हणजे तुम्ही ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये अतिरिक्त नंबर ऑपरेट करू शकाल.

रिपोर्टनुसार, या ओएसमध्ये मल्टीपल इनेबल्ड प्रोफाइल (MEP) नावाचे फीचर उपलब्ध असेल. याच्या मदतीने तुम्ही एकाच ई-सिम (eSIM) वर तुमचे प्रोफाइल दोन ऑपरेटर्समध्ये स्विच करू शकाल. गुगलने 2020 मध्ये या फिचरचे पेटंट घेतले. हे फिचर दोन डिजिटल सिम एकाच वेळी चालवण्यास मदत करते. गुगलचे इंजिनियरिंग पिक्सल हार्डवेअरवर त्याची चाचणी करत असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते.

ड्युअल ई-सिम सपोर्टचे फायदे -
स्मार्टफोनमधील ई-सिमवर दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे नंबर चालवता येतात. तेव्हा सिम स्लॉटच्या जागी मायक्रो एसडी कार्ड निश्चित करता येते. हे सध्या अनेक कंपन्या सिम ट्रेमध्ये देत नाहीत. याशिवाय बॅटरीचा mAh वाढवता येतो. ज्यामुळे फोनचा बॅकअप वाढेल. विशेष बाब म्हणजे, फिजिकल सिमशिवाय तुम्ही स्मार्टफोनवर दोन भिन्न नंबर चालवू शकता.

बातम्या आणखी आहेत...