आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Honda Amaze Crosses 5 Lakh Sales Milestone; Consideration Of Both Needs And Comforts | Marathi News

सर्वोत्तम तंत्रज्ञान:होंडा अमेझने पार पाडला 5 लाख विक्रीचा विक्रमी टप्पा ; गरजा आणि सुखसुविधा दोन्हींवर भर

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रीमियम फॅमिली सेदान कारमध्ये भारतात २०१३ पासून लोकप्रिय ठरलेल्या होंडा अमेझने आतापर्यंत ५ लाख कारची विक्री केली. यासंदर्भातील घोषणा नुकतीच होंडा कार्स इंडिया प्रा. लि. तर्फे अधिकृतरीत्या करण्यात आली. विकसित डिझाइन, सर्वोत्तम तंत्रज्ञान, प्रशस्त इंटेरियर, उत्कृष्ट इंधन क्षमता, आरामदायी रचना, आधुनिक वैशिष्ट्ये आणि सर्वोत्कृष्ट सुरक्षा यंत्रणा या व अशा विविध वैशिष्ट्यांमुळे भारतातील महानगरांसोबतच छोट्या छोट्या शहरांमधील ग्राहकांनी होंडा अमेझला पसंती दर्शवल्याचे या विक्रीवर निदर्शनास येत आहे. अधिक गुणवत्ता, कमी देखभाल खर्च, विश्वासार्ह सेवा या सर्व गोष्टींमुळे नवीन व प्री-ओन्ड मार्केटमध्येही होंडा अमेझला प्रचंड मागणी आहे. यातूनच वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स भारतीय बाजारपेठेत आज यशस्वी ठरलेली आहेत. ‘मेड इन इंडिया’ अंतर्गत कंपनी भारतातच निर्मिती करत आहे.

ग्राहकांच्या गरजा आणि सुखसुविधा या दोन्हींचा विचार केल्यामुळेच आम्ही हा विक्रमी टप्पा पूर्ण करू शकलो, हा आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण असल्याचे होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष आणि सीईओ ताकुया त्सुमुरा म्हणाले. भविष्यकाळातही होंडा अमेझ ही भारतीय तरुणांच्या सर्व इच्छा पूर्ण करत त्यांच्या महत्त्वाकांक्षांना नवी साथ देण्यासाठी सज्ज असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...