आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tech auto
  • Honda Launches Shine 100 CC Cheapest; Bike And Booking Delivery Update | Teck Auto News

होंडाची सर्वात स्वस्त बाईक लॉंच:100cc इंजिन बाईकची किंमत 65 हजार; आजपासून बुकिंगला सुरूवात, मे महिन्यात मिळेल

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया (Honda Motorcycle and Scooter India- HMSI) ने आज म्हणजेच बुधवारी (15 मार्च) आपली सर्वात स्वस्त बाईक शाइन 100cc लाँच केली आहे. ही बाईक देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या हिरो स्पेलन्डंर, एचएफ डिलक्स आणि बजाज प्लाटिना या गाड्यांशी स्पर्धा देणार आहे.

ही बाईक कंपनीच्या लोकप्रिय होडा शाईन 125cc ची छोटी आवृत्ती आहे. त्याची सुरूवातीची किंमत 64,900 रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) ठेवण्यात आली आहे. ऑल न्यू होंडा शाइनचे बुकिंग आजपासून सुरू झाले. बाईक मे-2023 महिन्यात ग्राहकांना दिली जाईल. ही गाडी पाच रंगांमध्ये उपलब्ध राहील.

चांगले मायलेज मिळेल- कंपनीचा दावा
शाइन 100 हे सर्व-नवीन एअर-कूल्ड, 99.7cc, सिंगल-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित आहे. नवीन इंधन-इंजेक्टेड 100cc इंजिन अधिक चांगले मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे. दुरुस्तीचे काम सोपे करण्यासाठी, त्यात इंजिनच्या बाहेर इंधन पंप आहे. यात सोलेनोइड स्टार्टर देखील आहे जे कोणत्याही तापमानात बाइक सुरू करण्यास मदत करते.

नवीन शाइन E20 इंधनावर देखील चालण्यास सक्षम असणार आहे. त्याचवेळी यात हॅलोजन हेडलाईट, साइड-स्टँड इनहिबिटर, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. हे 5 रंगात उपलब्ध आहे. यात लाल, निळा, हिरवा, सोनेरी आणि काळ्या बेससह राखाडी पट्ट्यांचा समावेश आहे. याचा व्हीलबेस 1245 मिमी आहे. सीटची उंची 786 मिमी आणि ग्राऊंड क्लीअरन्स 168 मिमी आहे.

होंडा शाईन हिरोच्या बाईकशी स्पर्धा करणार

  • होंडा शाईन 100 हिरो मोटोकॉर्पच्या बाईकशी स्पर्धा करेल. या सेगमेंटमध्ये हिरोची चार उत्पादने आहेत.
  • HF 100, HF Deluxe, Splendor+ आणि Splendor+ XTEC असून त्याची किंमत 54,962 ते 75,840 रुपये आहे.
  • बजाजकडे या सेगमेंटमध्ये फक्त प्लॅटिना- 100 आहे, ज्याची किंमत 67,475 रुपये आहे.
  • दरम्यान, 64,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह होंडा शाईन- 100 भारतात 100cc स्पेसमध्ये सेंट्रलाईज असेल.

ग्रामीण भागात होंडाचा केवळ 3.5% सहभाग
मूळ 100 सीसी बाईक सेगमेंट देशातील एकूण बाइक विक्रीपैकी एक तृतीयांश आहे. अशा परिस्थितीत नवीन शाइन 100 हे जपानी कंपनीसाठी भारतातील उत्तम उत्पादन ठरू शकते. सध्या, होंडाचा ग्रामीण भागात फक्त 3.5% हिस्सा आहे. नवीन शाइन 100 सीसी सह कंपनी हे वाढवण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. नवीन शाइन-100 चे उत्पादन पुढील महिन्यापासून सुरू होणार असून मे 2023 मध्ये वितरण सुरू होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...