आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिक बाईक HOP OXO लॉंच:सिंगल चार्जवर धावणार 150 किमी, 4 सेकंदात पकडणार 0-40 किमीचा वेग, फिचर्स घ्या जाणून

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

HOP इलेक्ट्रिक मोबिलिटीने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक HOP OXO लाँच केली आहे. ही बाईक एका चार्जमध्ये 150 किमी धावेल. OXO इलेक्ट्रिक मोटरसायकल दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये जिओ-फेन्सिंग, अँटी थेफ्ट सिस्टम आणि राइड स्टॅटिस्टिक्स यांसारखे फिचर्स देखील आहेत. त्याची सुरुवातीची किंमत 1,24,999 रुपये आहे.

दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे ही बाईक
ही बाईक OXO आणि OXO X या दोन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 4 राइडिंग मोड उपलब्ध आहेत. यामध्ये इको, पॉवर, स्पोर्ट्स आणि टर्बो यांचा समावेश आहे. हे 4 मोड्स फक्त त्याच्या टॉप व्हेरियंट OXO X मध्ये उपलब्ध आहेत. तर, OXO प्रकारात फक्त तीन राइडिंग मोड्स उपलब्ध आहेत. टर्बो मोड OXO प्रकारात उपलब्ध नाही. प्रत्येक मोड वेगवेगळ्या स्पीड आणि रेंज देते.

यात इको, पॉवर, स्पोर्ट्स आणि टर्बो असे एकूण चार मोड्स मिळतील.
यात इको, पॉवर, स्पोर्ट्स आणि टर्बो असे एकूण चार मोड्स मिळतील.

4 सेकंदात 0-40 किमीचा वेग
कंपनीच्या म्हणण्यानुसार, Hop Oxo-X च्या टर्बो मोडमध्ये टॉप स्पीड 90 km प्रति तास आहे आणि ते 4 सेकंदात 0-40 km प्रति तास वेग वाढवू शकते.

4 तासांपेक्षा कमी वेळात बॅटरी 80% चार्ज होईल
कंपनीचे म्हणण्यानुसार, कोणत्याही 16 amp पॉवर सॉकेटद्वारे पोर्टेबल स्मार्ट चार्जरवरून ही बाइक चार्ज केली जाऊ शकते. बॅटरी पॅक सरासरी 0 ते 80% पर्यंत 4 तासांपेक्षा कमी वेळेत चार्ज करते. ही इलेक्ट्रिक बाइक 5 तासांत पूर्ण चार्ज होते.

4 तासांपेक्षा कमी वेळात बॅटरी 80% पर्यंत चार्ज होईल.
4 तासांपेक्षा कमी वेळात बॅटरी 80% पर्यंत चार्ज होईल.

4G कनेक्टिव्हिटी मिळेल
हे 4G कनेक्टिव्हिटी आणि पार्टनर मोबाइल अॅप्लिकेशनसह येते, जे स्पीड कंट्रोल, जिओ-फेन्सिंग, अँटी थेफ्ट सिस्टम, राइड स्टॅटिस्टिक्स यासारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...