आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यातील संधी:भारत ईव्हीचे तिसरे मोठे मार्केट, 2030 पर्यंत यात 5 कोटी नोकऱ्या,

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ई-वाहने : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचे भवितव्य, आयटी प्रोफेशनल्स आणि इंजिनिअर्ससाठी करिअरची उमेद

नोकऱ्यांच्या दृष्टीने ई- वाहने उद्योग आता मजबूत क्षेत्र ठरेल. आर्थिक सर्व्हे २०२२-२३ च्या नुसार ई–व्हेइकल उद्योगात २०३० पर्यंत ५ कोटी नव्या नोकऱ्या निर्माण होतील. यामुळे ई वाहनाला ऑटोमोबाइल उद्योगाचे भवितव्य म्हटले जात आहे. विक्रीच्या दृष्टीने भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल बाजार आहे. या क्षेत्रात आता करिअरची चांगली संधी आहे हे स्पष्ट आहे. पदवीधरही या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. मात्र, यात करिअर करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. या उद्योगात मुख्यत्वे चार क्षेत्र आहेत, ज्यात तुम्ही नोकरी शोधू शकता- ओरिजनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (ओईएम), कॉम्पोनन्ट्स मॅन्युफॅक्चरर, इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रोवायडर (ईएसपी) आणि टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन एजन्सी. टाटा, महिंद्रा आणि ह्युंडई सारख्या कंपन्या २०२५ पर्यंत ३०-४० नव्या ईव्ही लाँच करतील. अॅनालिस्ट व प्रॉडक्ट डिझायनरची मागणी वाढेल. येत्या १२ महिन्यात ईव्ही इकोसिस्टमला १० हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची गरज भासेल.

या प्रोफेशनल्सची भरती वाढेल

या क्षेत्रात प्रॅक्टिकल नॉलेज गरजेचेया उद्योगात करिअर करण्यासाठी इंजिनिअर कॉन्सेप्टचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिकल इंजिनिअर्स ईव्हीच्या सिस्टमची डिझायन व ते तयार करतात. यामुळे इंजिनिअर्सची मागणी या क्षेत्रात जास्त आहे. येथे ज्ञानासह प्रॅक्टिकल ट्रेनिंगही आवश्यक आहे. निती आयोगानुसार २०३० पर्यंत ८०% दुचाकी, तीन चाकी वाहने आणि ३०-७०% कार ईव्हीत रुपांतरीत होतील. या क्षेत्रात प्रॉडक्ट डिझायनर्स, मॅकेनिकल इंजिनिअर्स, केमिकल इंजिनिअर्स आणि आयटी प्रोफेशनल्सची भरती वाढेल.

स्टार्टअप्सनेही वाढवल्या या क्षेत्रात संधीया क्षेत्रात अनेक प्रकारची आव्हाने आहेत, जसे चार्जिंग टाइम, बॅटरी बदलण्याचा खर्च व मर्यादीत रेंज. मात्र, ईव्ही स्टार्टअप्स ही आव्हाने दूर करण्यासाठी काम करत आहे. बंगळुरूतील स्टार्टअप एथर एनर्जीने देशातील पहिली स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर बनवली आहे. असेच अनेक स्टार्टअप्स आहेत जे उद्योगाला चांगले करण्यासाठी काम करत आहेत. ते चांगली मोबिलिटी व बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम सारख्या अनेक सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहेत.